Pathan Controversy : आपण दिवसेंदिवस छोट्या विचारांचे होत चाललो आहोत, पठाणच्या वादावर बोलल्या आशा पारेख..

पठाणच्या वादावर ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी आपलं मत मांडलं आहे.
Asha Parekh | Pathaan | Deepika Padukone | Asha parekh reaction | Besharam Rang
Asha Parekh | Pathaan | Deepika Padukone | Asha parekh reaction | Besharam RangDainik Gomantak
Published on
Updated on

Besharam Rang: शाहरुख खानचा पठाण दिवसेंदिवस वादात अडकतच चालला आहे. काहींना हा चित्रपट हिंदु धर्माचा अपमान करणारा वाटला तर कित्येकांनी अश्लीलतेचा आरोप चित्रपटातल्या 'बेशरम रंग' या गाण्यावर केला आहे. या वादात उडी घेत अयोध्येच्या एका संताने तर शाहरुखची चामडी सोलुन त्याला जिवंत जाळण्याची भाषा केली.

या वादावर आता बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.आशा पारेख बॉलिवूडच्या एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. पठाणवर चाललेल्या वादावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आशा पारेख म्हणतात अलिकडचे चित्रपट हे मनोरंजनप्रधान असतात. त्यात अभिनेत्रींना करण्यासारखे काहीही नसते ;पण काही स्त्रीप्रधान चित्रपटही आहेत ते कौतुकास्पद आहेत.मोठमोठ्या चित्रपटात अभिनेत्रींंना स्क्रिनवर कमी स्थान मिळते. ही पुरूषप्रधान इंडस्ट्री आहे,मला यात बदल बघायचा आहे.

Asha Parekh | Pathaan | Deepika Padukone | Asha parekh reaction | Besharam Rang
HBD Anil Kapoor: वय वाढलं तरीही फिटनेस झकास; अनिल कपूर यांचे 'हे' 10 हिट चित्रपट पाहिलेत का?

'पठाण' चित्रपटाच्या वादावर बोलताना त्या म्हणाल्या "इंडस्ट्री मरत चालली आहे. जर एखाद्या अभिनेत्रीने भगवा रंग घातला तर लोक त्याला बॉयकॉट करत आहेत. आधीच लोक थिएटरमध्ये जात नाहीत त्यात असे बॉयकॉट ट्रेंड चालले तर इंडस्ट्री संपुन जाईल. दीपिकाच्या बिकीनीवरच्या वादावर पुढे त्या म्हणाल्या लोकांचा मेंदु काम देत नाही. लोक खुपच छोट्या विचारांचे होत चालले आहेत. बॉलिवूड नेहमीच लोकांसाठी सॉफ्ट टार्गेट राहिलेलं आहे".

आता बघुया लोक आशा पारेख यांच्या या मतावर सहमत होतात की नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com