Anant Ambani Dainik Gomantak
मनोरंजन

Anant Ambani: अंबानीच्या कार्यक्रमात बॉलीवूडचे तीन खान एकत्र थिरकले; चाहते म्हणाले- 'शाहरुख...'

Anant Ambani: मी करु शकतो असा विश्वास त्यांनी मला दिला

दैनिक गोमन्तक

Anant Ambani pre wedding 3 khan's dance together

सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमामुळे सध्या अंबानी कुटुंब चर्चेत आहे. या कार्यक्रमाला जगातील महत्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. आता गुजरातमधील जामनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शाहरुख, सलमान आणि आमिर खान या तिघांनी एकत्र डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असताना दिसत आहे. जय श्री राम असे म्हणत शाहरुखने स्टेजवर एंट्री केली आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मिडियावर नेटकरी मोठ्या प्रमाणात कंमेट करताना दिसत आहेत. अनेकांनी शाहरुखचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे, शाहरुख हा किंग आहे. एकाने SRK बेस्ट असल्याचे म्हटले आहे. यानंतर दाक्षिणात्य अभिनेता रामचरणबरोबर तीन खान नाटू नाटू या गाण्यावर थिरकरताना दिसत आहेत.

दरम्यान, अनंत अंबानींचा आपल्या पालकांविषयी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. माझ्या पालकांनी नेहमीच मला पाठिंबा दिला, ते सोबत राहिले. मी करु शकतो असा विश्वास त्यांनी मला दिला म्हणून आत्मविश्वासाने आज सगळ्यांसमोर उभा आहे. असे अनंत अंबानींनी म्हटले आहे.

या सोहळ्याला बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत तसेच जगभरातील बिझनेस क्रिकेटर यांनीदेखील हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहेत. चाहते आपापल्या आवडत्या कलाकारांचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT