Anushka Pregnancy Dainik Gomantak
मनोरंजन

Anushka Pregnancy : अनुष्का - विराट दुसऱ्या बाळाचं स्वागत करतायत?

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.

Rahul sadolikar

Anushka Sharma Preganancy : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली हे एक क्युट सेलिब्रिटी कपल म्हणून ओळखलं जातं. दोघांच्या सोशल मिडीयावरच्या पोस्टलाही चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

एखादी क्रिकेट मॅच असो अथवा अनुष्काचा एखादा चित्रपट या कपलची चर्चा सोशल मिडीयावर असतेच. सध्या दोघे एका बाळाचं संगोपन अतीशय प्रेमाने करत आहेत. ;पण आता सध्या चर्चा आहे ती विराट- अनुष्काच्या दुसऱ्या बाळाची.

वामिका नावाचं पहिलं बाळ

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, “अनुष्काला तिच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. मागच्या वेळेप्रमाणे आधी कसलीही कल्पना न दे ता , ते नंतरच्या टप्प्यावर औपचारिकपणे या बातम्या सर्वांसोबत शेअर करतील, अशी शक्यता आहे.  या जोडप्याला वामिका ही मुलगी आहे , जिचा जन्म जानेवारी २०२१ मध्ये झाला होता.

अनुष्का विराटसोबत कुठे का दिसत नाही?

अनुष्का शेवटची मुंबईत एका कार्यक्रमात दिसली होती. हा योगायोग आहे, की खरंच अनुष्का तिच्या प्रेग्नन्सीमुळे लोकांच्या नजरेपासून दूर राहत आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

गेल्या काही काळापासून अनुष्का शर्मा विराटसोबत प्रवास करत नाही किंवा त्याच्या सामन्यांनाही हजेरी लावत नाही, इतरवेळी विराटसोबत सतत मॅच किंवा इतर कारणांनी असणारी अनुष्का आता का दिसत नाही? असा प्रश्न चाहत्यांना आता पडला आहे.

पापाराझींना केली विनंती

मिळालेल्या माहितीनुसार नुकतंच विराट अनुष्काला मुंबईतील एका डिलिव्हरी क्लिनिकमध्ये पाहिले गेले होते: "त्यांनी लवकरच घोषणा करण्याचे वचन देऊन पापाराझींना त्यांचे फोटो व्हायरल न करण्याची विनंती केली."

वामिका जन्मापासून

वामिकाच्या जन्मापासून, ते सार्वजनिकपणे तिचा चेहरा न दाखवण्याबद्दल किंवा तिचे फोटो ऑनलाइन पोस्ट न करण्याबद्दल अनुष्का विराट खूप काळजी घेतात.

कोहलीने याआधी सांगितले होते की, "आम्ही आमच्या मुलाला समजून घेण्यापूर्वी आणि स्वतःची निवड करण्यापूर्वी सोशल मीडियावर इतरांना न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे."

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT