शाही थाटातले राघव आणि बाल्कनीत लाजणारी नवरी... परिणितीने शेअर केला शाही लग्नाचा व्हिडीओ

अभिनेत्री परिणिती चोप्राने आपल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
Parineeti Chopra Shares Video on Instagram
Parineeti Chopra Shares Video on InstagramDainik Gomantak
Published on
Updated on

Parineeti Chopra Shares Video on Instagram : 24 सप्टेंबरला अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांचा विवाह शाही थाटात पार पडला. या लग्नसोहळ्याला बॉलीवूडच्या सेलिब्रिटींसह राजकारणातले मान्यवर उपस्थित होते

उदयपूरमध्ये पार पडला विवाहसोहळा

राघव - परिणितीच्या विवाह सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचा एक व्हिडीओ आता स्वत: नव्या नवरीनेच शेअर केला आहे.

लग्नाच्या दिवशी ओ पिया...

अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील एक चांगली गायिका आहे. परिणिती तिची गाणी सोशल मिडीयावर शेअर करत असते. आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यासाठी परिणितीने लग्नासाठी एक स्पेशल गाणे रेकॉर्ड केले. या गाण्याचं नाव आहे ओ पिया. 

परिणितीच्या या गोड गाण्याने त्यांच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. हिंदी आणि पंजाबी भाषेतील बोल असलेल्या या गाण्यात परिणीतीने राघववरील तिचे प्रेम व्यक्त केले.

उदयपूरमध्ये रिसेप्शन

परिणीती आणि राघवने उदयपूरमध्ये मित्र आणि कुटुंबासाठी रिसेप्शनही आयोजित केले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी परिणीती आणि राघवच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

Parineeti Chopra Shares Video on Instagram
Gauri Khan : "हा जवानच्या बॉक्स ऑफिसचा ग्लो आहे" गौरी खानच्या त्या सेल्फीवर यूजर्सच्या विनोदी प्रतिक्रिया

चंदीगड आणि दिल्लीतील रिसेप्शन रद्द

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार , चंदीगड आणि दिल्लीतील रिसेप्शन रद्द करण्यात आले आहेत आणि परिणीती आणि राघव आता 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत त्यांच्या मित्रांना एका भव्य रिसेप्शनमध्ये होस्ट करतील.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com