Twitter Blue Tick:  Dainik Gomantak
मनोरंजन

Twitter Blue Tick: एलन मस्ककडेच तक्रार; बीग बी यांच्या ट्विटर अकाऊंटमध्ये मोठा बदल

थेट एलन मस्ककडेच तक्रार केल्यानंतर बिग बींना त्यांच्या अकाऊंटवर पुन्हा एकदा ब्ल्यू टिक मिळाली आहे.

Puja Bonkile

Amitabh Bachchan Blue Tick:  ट्विटरने सध्या एक मोठा बदल केला आहे. आता ब्लु टिकसाठी युजर्सला पैसे मोजावे लागणार आहे. ज्या लोकांनी पैसे भरले नाही त्यांचे ब्लु टिक काढण्यात आले आहे. या यादीमध्ये राजकीय, क्रिडा आणि बॉलिवुड स्टार्सचा देखील समावेश आहे.

दरम्यान, बॉलिवुडचे बीग बी अमिताभ बच्चन यांचे ब्लू टिक जाताच एक ट्वीट करत पुन्हा एकदा ब्लू टिक मागितली. थेट एलन मस्ककडेच तक्रार केल्यानंतर अखेर आता बिग बींना त्यांच्या अकाऊंटवर पुन्हा एकदा ब्ल्यू टिक मिळाली आहे.

बॉलिवुडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाऊंटवर ब्लू टिक परत आली आहे. 21 एप्रिल रोजी ट्विटरवरून अनेकेांचे ब्लू टिक्स काढण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाऊंटचे पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे.

यानंतर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पुन्हा एकदा ब्लू टिक आली आहे. पण ही ब्लू टिक हटवताच अमिताभ यांनी एकामागून एक ट्विट केले होते. या ट्विट्सच्या माध्यमातून त्यांनी एलन मस्क यांना त्यांचे ट्विटर अकाऊंटचे पुन्हा व्हेरिफिकेशन करण्यास सांगितले आणि आता असेच काहीसे घडले. त्यांचे ट्विटर अकाऊंट अखेर पुन्हा व्हेरिफाय करण्यात आले आहे. यामुळे बिग बींचे चाहते खूप खूश झाले आहेत.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ब्लॉग आणि ट्विटरच्या माध्यमातून ते आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे ब्लू टिक हटवताच अमिताभ बच्चन यांनी लगेचच ट्वीट करत तक्रार केली होती.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'ट्विटर भाऊ! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्ही पैसेही भरले आहेत…म्हणजे जे निळे कमळ आहे, ते आता आमच्या नावापुढे लावा भाऊ.. म्हणजे लोकांना कळेल की, आम्हीच आहोत - अमिताभ बच्चन..' त्यांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले होते.

अमिताभ बच्चन यांच्यासह शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट्ट, प्रकाश राज यांसारख्या अनेक स्टार्सच्या अकाऊंटवरून ब्लू टिक्स काढण्यात आले आहे. पण आता बिग बींच्या अकाऊंटला पुन्हा ब्लू टिक मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT