Amitabh Bachchan in KBC Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan in KBC : अशा लपवतात बिग बी आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, केबीसीमध्ये स्वत:च सांगितले गुपित...

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बिग बॉसमध्ये आपल्या मेक-अपचे रहस्य सांगितले आहे.

Rahul sadolikar

Amitabh Bachchan in Kaun Banega Crorepati : सध्या बिग बी म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सीझनमुळे चांगलेच चर्चेत आहेत.

'कौन बनेगा करोडपती 15' च्या ताज्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दाढीशी संबंधित एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. 

बिग बी मेकअपशिवाय सुरकुत्या आणि हनुवटीची डबल चेन कशी लपवतात हे देखील सांगितले. त्यांची युक्ती ऐकून स्पर्धक कपिल देवही थक्क झाला.

कौन बनेगा करोडपती सीझन 15

'कौन बनेगा करोडपती 15'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. नवा सीझन होस्ट अमिताभ बच्चनसोबत नव्या रुपात परतला आहे आणि प्रेक्षकांनी बिग बींचं त्याच जोमाने स्वागत केलं आहे. नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन देखील स्पर्धकांसोबत खेळ खेळतात तसेच मजा करतात. 

16 ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात स्पर्धक कपिल देवपासून होते. त्याला शाहरुख खानची पत्नी गौरी खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यादरम्यान त्याने आपल्या दाढीचे रहस्य उघड केले. तो त्याच्या सुरकुत्या कशा लपवतो हे देखील सांगितले.

दाढी आणि मिशांबद्दल म्हणाले

खरं तर, स्पर्धक कपिल देव यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या मिशांबद्दल प्रश्न विचारला होता की, ते ती कशी राखतात. यावर बिग बींनी म्हटले होते की, ते मिशीची काळजी घेत नाही ;पण दाढी स्वत: सांभाळतात. त्यानंतर त्यांनी त्यांच्या 'अक्स' चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला.

फ्रेंच कट बियर्डबद्दल बिग बी म्हणाले

अमिताभ बच्चन म्हणाले, 'अक्स'च्या शूटिंगदरम्यान मला माझी दाढी अशीच राखावी लागली. जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिले तेव्हा मला ही स्टाईल आवडली. तेव्हापासून मी माझ्या स्टाईल (फ्रेंच कट) ठेवली आहे. बिग बी पुढे म्हणाले जसजसे वय वाढते तसतसे इतर गोष्टी करायला हव्यात. 

जसे की हनुवटीची चेन आणि सुरकुत्या. माझ्या लक्षात आले की ही दाढी डबल चेन आणि सुरकुत्या लपवण्यासाठी देखील मदत करते. म्हणूनच मी दाढी अशा स्टाईलमध्ये ठेवली आहे आणि ती नेहमी ट्रिम करतो.

कपिलने जिंकले 12 लाख

त्यांनी कपिल देवसोबत पुढचा खेळ सुरू केला. कपिल देव यांनी 'सुपर सँडूक' फेरीत 70,000 रुपये जिंकले, तर प्रेक्षक पोल लाइफलाइनच्या मदतीने त्यांनी 3,20,000 रुपये जिंकले. एपिसोड संपेपर्यंत कपिल देव यांनी 12 लाख 50 हजार रुपये जिंकले होते. आता 'KBC 15' च्या 17 ऑगस्टच्या भागात ते पुढचा गेम खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT