Amitabh Bachchan : बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन त्यांच्या शिस्तप्रिय आणि काटेकोर दैनंदिन जीवनशैलीसाठी ओळखले जातात. पण बिग बींनी त्यांच्या एका वाईट सवयीविषयी सांगितलं आहे. सोशल मिडीयावरची ही वाईट सवय आहे आणि त्यात खूप वेळ जातो असंही बिग बींनी सांगितलं आहे.
सोशल मीडिया हे देखील एक व्यसन आहे. त्यावर रिल्स पाहणे ही आता सवय झाली आहे. यात किती तास निघून जातात ते कळतही नाही. हे कदाचित तुमच्यासोबत घडले असेल किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल.
पण तुम्हाला माहित आहे का की खुद्द अमिताभ बच्चन देखील या व्यसनाचे बळी आहेत! 'कौन बनेगा करोडपती सीझन 15'मध्ये त्याने हा खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी KBC 15 मध्ये खुलासा केला की, जेव्हा ते ब्लॉग लिहायला जातात तेव्हा ते सोशल मीडियावर रील पाहू लागतात. कोण काय बोलतंय हेही ते बघू लागतात आणि या प्रकरणात दीड-दोन तास कधी निघून जातात, तेही लक्षात येत नाही.
अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, 'सुमारे 1-2 वर्षांपूर्वी माझी मेकअप आर्टिस्ट रेणुका पिल्लई यांनी मला सांगितले होते की मी किती पूर्वी माझ्या ओळींची रिहर्सल करायचो आणि आता अचानक मी नेहमी फोनवर असतो. ती बरोबर आहे हे माझ्या लक्षात आले आणि दुसऱ्याच क्षणी मी माझ्या मोबाईल मधून सर्व सोशल मीडिया डिलीट केला.
अमिताभ बच्चन असेही म्हणतात की त्यांनाही सध्या सोशल मीडियाच्या व्यसनाचा सामना करावा लागत आहे. तो म्हणाले, 'मी तुम्हाला सांगतो, मी काही दिवसांपासून पाहतोय, मी एक ब्लॉग लिहितो, मला असे वाटते की ते पब्लिश करूया (सोशल मीडियावर), मग मी त्यातून काहीतरी काढून त्यावर पोस्ट करतो, मग ती सवय होऊन जाते.
पुढची व्यक्ती काय म्हणाली? त्याच्याशी आपला काही संबंध असो वा नसो, दीड-दोन तास निघून जातात. तुम्हाला ते कळत नाही आणि नंतर लक्षात येते, ४ वाजले आहेत, ही खूप वाईट सवय आहे.