Pushpa Dainik Gomantak
मनोरंजन

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना लवकरच सूरू करणार 'Pushpa The Rule' चे शूटिंग

Pushpa The Rule Shooting: 'पुष्पा 2' या चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

'पुष्पा द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 100 कोटींची कमाई केली असतानाच या चित्रपटाने 300 कोटींची कमाई करून जगभरात रेकॉड बनवला आहे. चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना पॅन इंडियाचे स्टार बनले. आता चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 'पुष्पा द रूल' चे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. (allu arjun rashmika mandana start shooting pushpa rule july)

अल्लू अर्जुन जुलैपासून 'पुष्पा द रूल' (Pushpa The Rule) चे शूटिंग सुरू करणार असल्याच्या बातम्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी 'पुष्पा' च्या सिक्वेलची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे (Movie) बजेटही निश्चित केले आहे. त्यामुळे चित्रपटाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

'पुष्पा-द रूल' अनेक बदलांसह रिलीज होईल

'पुष्पा-द राइज' ने देशभरात यश मिळवले होते. निर्मात्यांना 'पुष्पा 2' मध्ये कोणतीही कमतरता ठेवायची नाही. जिथे या चित्रपटाच्या बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. तिथे ‘पुष्पा 2’ मध्ये तुम्हाला बॉलिवूडमधील (Bollywood) इतर अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतील. त्यामुळेच चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल करण्यासाठी दिग्दर्शकाला बराच वेळ लागला.

'RRR' आणि 'KGF: Chapter 2' (KGF 2) सारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांचे यश पाहून दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटात अनेक नवीन बदल करण्याचा विचार केला आहे. सध्या तरी 'पुष्पा 2' च्या शूटिंगबाबत निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही, परंतु अल्लू अर्जुनचे चाहते या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT