Pushpa 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Allu Arjun Pushpa: अल्लु अर्जुनचा भाव वाढला! पुष्पा-2 घेणार एवढे मानधन

गोमन्तक डिजिटल टीम

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज' या (Allu Arjun Pushpa) चित्रपटाने जोरदार यश मिळवले, चित्रपटाचे डायलॉग आजही प्रत्येकाच्या तोंडी आहेत. चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येत आहे. शूटिंग देखी सुरू झाले आहे. नुकतेच यानिमित्ताने एका पूजेचेही आयोजन करण्यात आले होते, त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या भागाचे नाव 'पुष्पा द राइज' असे होते, तर दुसऱ्या भागाचे नाव 'पुष्पा द रुल' असे असणार आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती इन्स्टाग्रामवरील एका पेजवरून शेअर करण्यात आली आहे.

पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जुन चांगलाच भाव खायला लागला असल्याचे दिसत आहे. अलिकडे इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अल्लू अर्जुन पुष्पाच्या दुसऱ्या भागासाठी 125 कोटी घेणार असून, अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटासाठी 5 कोटी घेणार आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यात जगभरात प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुष्पा 2 चे शूटिंग सुरू होऊ शकते. त्यानंतर रश्मिका मंदाना देखील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पा द राइज 21 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनने तर खळबळ उडवून दिली होतीच, शिवाय हिंदीतही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT