पोम्बुर्फा येथे 17 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

गणेश चतुर्थी उत्सवासाठी सजावट करताना घडला अनर्थ; नागरिकांनी विजेचे सजावट साहित्य वापरताना काळजी घेणे आवश्यक
Pomburpa news
Pomburpa news Dainik Gomantak

दोन दिवसांवर गणेश चतुर्थी उत्सव असल्याने राज्यभरात मोठ्या उत्साहाने गणेश उत्सवासाठी तयारी सुरु झाली आहे. यासाठी मुख्यत: लाईट बल्बचा वापर करत आरास केली जाते. या पार्श्वभूमीवर पोम्बुर्फा येथे गणेश चतुर्थी उत्सवासाठी सजावट करताना एका 17 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे.

(17 year boy died of electrocution at Pomburpa)

Pomburpa news
नोकरीच्या आमिषाने गोव्यातील युवकाला दीड लाखाला फसवले

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्री उशिरा बार्देश तालुक्यातील पोम्बुर्फा येथील वालावली येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोम्बुर्फा येथील वालावली येथे यश्मित चारी या 17 वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

मृत यश्मित चारी हा 27 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा गणेश चतुर्थी उत्सवासाठी सजावट करत होता. यावेळी सजावटीसाठी म्हणून लाईट माळा जोडताना विजेचा धक्का लागल्याने यश्मित खाली कोसळला यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला होता.

Pomburpa news
Goa Corona Update: राज्यात चार दिवसात चार रुग्ण दगावले, आज नवे 71 रूग्ण

अवघ्या 17 व्या वर्षी आई - वडिलांच्या हाता - तोंडाशी आलेला यश्मितचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि परिसरातील आप्तगणांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

गणेश उत्सव काळात नागरिकांनी विद्यूत सजावटचा वापर सावधपणे करावा

गणेश उत्सवासाठीच्या लाईट माळ ह्या प्रत्येकवेळी नविनच असतात असे नाही. त्यामूळे या माळा नादुरुस्थ ही असू शकतात. नागरिकांनी याचा वापर करताना त्या काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. कारण गणेशासाठी आरास करण्याकरीता वापरले जाणारे साहित्य हे प्रत्येकवेळी सुरक्षित असेलच हे सांगता येत नाही.

कधी - कधी सुरु असलेल्या लाईट माळ, अथवा तत्सम विजेचे सजावट साहित्य हे सुरु असतानाच नादुरुस्थ होत विद्यूत सप्लाय लोखंडी साहित्याला ही होऊ शकतो. यामूळे कधी ही काळजी घेणे योग्य ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com