Movie Pushpa Release In Russia Dainik Gomantak
मनोरंजन

Movie Pushpa Release In Russia: आता रशियात घुमणार 'झुकेगा नहीं साला' संवाद

अल्लू अर्जून-रश्मिकाकडून रशियात 'पुष्पा' चित्रपटाच्या प्रमोशनला सुरवात

Akshay Nirmale

Movie Pushpa Release In Russia: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अनेक भाषेतील बॉक्स ऑफिसवर दबदबा राखला. आता निर्माते रशियामध्ये या चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुख्य कलाकारांसह चित्रपटाची टीम त्यासाठी रशियात दाखल झाली.

हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता. म्हणजे वर्ष उलटले आहे. आता कलाकार आणि क्रू यांच्या उपस्थितीत 1 डिसेंबर रोजी मॉस्कोमध्ये आणि 3 डिसेंबर रोजी सेंट पीटर्सबर्गमध्ये या चित्रपटाचा विशेष प्रीमियर होईल. तसेच, रशियातील 24 शहरांमध्ये होणाऱ्या 50 व्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.

'पुष्पा: द राइज'हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी रशियात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटींची उड्डाणे घेतली होती. विविध प्रादेशिक भाषांसह हिंदीतही या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता. एकीकडे हा चित्रपट प्रदर्शित होत असताना या चित्रपटाचा सीक्वेल 'पुष्पा : द रुल' ची देखील तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जून विरूद्द फहाद फासिल असा आणखी तीव्र सामना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला सुरवात झाली आहे.

याशिवाय अल्लू अर्जून आणखी दोन महत्वाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांची अद्याप नावे निश्चित्त झालेली नाहीत. पण यापैकी एक चित्रपट केजीएफ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा असणार आहे. तर दुसरा चित्रपट कोरटला शिवा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत आहे. दरम्यान, रश्मिकाच्या कामाचा विचार केला तर तिचा गुड बाय नावाचा चित्रपट हिंदीत येऊन गेला, पण तो बॉक्सऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. आगामी काळात रश्मिका 'मिशन मजनू' या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासाेबत दिसणार आहे. याशिवाय रणबीर कपुरच्या संदीप वनगा रेड्डी दिग्दर्शित 'अॅनिमल' या चित्रपटातही ती दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT