Vicky Kaushal Upcoming Film: सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक 'सॅम बहादुर'चा टीझर, रीलीज डेट जाहीर

विकी कौशलचा महत्वाकांक्षी चित्रपट पुढील वर्षात रीलीज होणार
Vicky Kaushal Upcoming Film
Vicky Kaushal Upcoming FilmDainik Gomantak
Published on
Updated on

Vicky Kaushal Upcoming Film: विकी कौशलचा महत्वाकांक्षी चित्रपट असलेल्या 'सॅम बहादूर'या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार हीने केले आहे.

Vicky Kaushal Upcoming Film
Chhatriwali First Look: रकुल प्रीतच्या 'छत्रीवाली'चा फर्स्ट लूक पोस्टर आउट

चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लूची व्यक्तिरेखा अभिनेत्री सान्या मल्होत्रा साकारणार असून, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत अभिनेत्री फातिमा सना शेखला पाहायला मिळेल.

या चित्रपटाचा टीझरही रीलीज केला गेला आहे. त्यात सॅम माणेकशॉ यांच्या रूपातील विकी कौशल पाठमोरा सैन्यांच्या मधून जाताना दिसतो.

Vicky Kaushal Upcoming Film
The Kashmir Files Row: वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नादव लॅपिड यांनी अखेर मागितली माफी

सॅम माणेकशॉ यांची लष्करी कारकीर्द चार दशके आणि पाच युद्धे अशी रंजक आहे. फील्ड मार्शल पदावर बढती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते. 1971 च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या लष्करी विजयामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. सॅम माणेकशॉ यांच्या रूपातील विकीचे फोटो सोशल मीडियात याआधीच चर्चेत आले आहेत. विकीने यापुर्वी मेघना गुलजारच्या राजी या चित्रपटातही काम केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mandovi River Pollution Report
Goa Crop Loss Compensation
 Goa Marathi Film Festival 2026
Telegram 15 Day Goverment Ultimatum
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com