Chhatriwali First Look: रकुल प्रीतच्या 'छत्रीवाली'चा फर्स्ट लूक पोस्टर आउट

Rakul Preet Chhatriwali: बी टाउन अॅक्ट्रेस रकुल प्रीत सिंहच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.
Chhatriwali First Look:
Chhatriwali First Look: Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने फार कमी वेळात आफली खास ओळख निर्माण केली आहे. रकुल (Rakul Preet) तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, रकुल प्रीतचा आगामी चित्रपट 'छत्रीवाली' (Chhatriwali) चा फर्स्ट लूक पोस्टर समोर आला आहे. रकुल प्रीत या चित्रपटात अशी भूमिका साकारणार आहे, जी आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्रीने साकारलेली नाही. रकुलचा 'छत्रीवाली' चित्रपटगृहांऐवजी OTT अॅपवर रिलीज होणार असल्याची माहिती आहे. 

  • 'छत्रीवाली'चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज
    'छत्रीवाली'चा फर्स्ट लूक पोस्टरने (Poster) चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. गुरुवारी बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'छत्रीवाली'चे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले.


    या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये रकुलने लिहिले की, जर जग बदलत असेल तर आपली विचारसरणीही बदलली पाहिजे. 'छत्रीवाली'च्या या पोस्टरमध्ये रकुल आपल्या हातात मानवी शरीराचा तक्ता घेऊन फ्रेश मुडमध्ये दिसत आहे. रकुल या चित्रपटात कंडोम टेस्टरची भूमिका साकारत आहे. जी आजपर्यंत बॉलीवूडची (Bollywood) एकही अभिनेत्री साकारू शकलेली नाही.

Chhatriwali First Look:
The Kashmir Files Row: वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नादव लॅपिड यांनी अखेर मागितली माफी

रकुल प्रीतचा 'पपेट' या वर्षी सप्टेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने भरपूर यश मिळवले. रकुलचा 'छत्रीवाली' चित्रपट ओटीटीला धूम ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. 'छत्रीवाली' प्रसिद्ध ओटीटी अॅप G5 अॅपवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नसली तरी 'छत्रीवाली' पुढील वर्षी जानेवारीच्या शेवटी रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात रकुलशिवाय सतीश कौशिक, राजेश तैलंग आणि सतीश व्यास महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com