Alia finally reveals her love
Alia finally reveals her love Dainik Gomantak
मनोरंजन

अखेर आलियाने केला आपल्या प्रेमाचा खुलासा

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक महत्वाची आणि फेमस जोडी म्हणजेच आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या जोधपूरमध्ये (Jodhpur) आहेत. सध्या अशी बातमी पसरत आहे; की हे जोडपे त्यांच्या लग्नासाठी एक खास आणि सुंदर ठिकाण शोधत आहेत. अलीकडेच दोघेही रणबीर कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खासगी विमानाने जोधपूरला गेले असल्याची बातमी समोर येत आहे. रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त (Ranbir Kapoor's birthday) आलिया भट्टने एक सुंदर फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटो सोबत आलिया भट्टने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Alia finally reveals her love

28 सप्टेंबर रोजी बॉयफ्रेंड रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो चित्र शेअर केला आहे. या चित्रात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर समुद्र किनाऱ्यावर कॅमेराकडे पाठ करून बसले आहेत. अभिनेत्रीने या फोटोसोबत कॅपशन दिले 'माझ्या आयुष्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे हा फोटो चाहत्यांना खूप आवडले असून यावर कमेंटचा वर्षाव होत आहे. एका तासात सुमारे 10 लाख लोकांनी हा फोटो पसंत केला आहे. आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत असा रोमँटिक शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत दोघांच्या लग्नाच्या बातम्यांविषयी शंका होती, पण या फोटोंनी बरेच काही समोर आले आहे.

फ्रंटवर्कवर, रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र', 'शमशेरा' आणि 'निमल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर आलिया भट्ट 'ब्रह्मास्त्र', 'रॉकी और रानी की लव्ह स्टोरी', 'गंगूबाई काठियावाडी', 'डार्लिंग्स', 'आरआरआर' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' मध्ये पहिल्यांदा स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

CM Pramod Sawant: ''किनारी भागातील व्यवसायांच्या संरक्षणासाठी...''; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आश्वस्त

Bombay High Court: ''विदेशी नागरिक आपल्या देशात मंत्री कसा होऊ शकतो''; सिक्‍वेरा यांच्याविरोधात मिकी यांची हायकोर्टात याचिका

Chandel Water Treatment Plant: चांदेल जलशुद्धी प्रकल्पामध्ये ‘क्लोरीन’ गळती; अनर्थ टळला

Churchill Alemao: ''माझे मत सेक्‍युलर पार्टीलाच, पण काँग्रेसला...''; आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT