Alia Bhatt Student Protest viral post Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

Alia Bhatt Instagram Post Student Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कथित NEET पेपर लीक प्रकरणाविरोधातील CJP (कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कथित NEET पेपर लीक प्रकरणाविरोधातील CJP (कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट हिनेही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या संघर्षाला सलाम केला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, त्यांच्या कुटुंबांची स्वप्ने आणि न्यायासाठीचा लढा यावर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला दिला आवाज

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या संदेशात गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या संघर्षाने स्वतःला भावनिक केल्याचे म्हटले आहे. प्रत्येक आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यामागे केवळ एक व्यक्ती नसून, त्याच्या कुटुंबाची स्वप्ने, अनेक वर्षांची मेहनत आणि त्याग दडलेला असल्याचे तिने नमूद केले.

तिच्या मते, हे विद्यार्थी केवळ स्वतःच्या हक्कांसाठी उभे नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक पारदर्शक आणि न्याय्य व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या धैर्याला आणि चिकाटीला तिने सलाम करत, समाजाने त्यांच्या आवाजाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.

सलमान खाननंतर आणखी एक मोठा पाठिंबा

यापूर्वी अभिनेता सलमान खान यानेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर आलियाच्या पोस्टमुळे या आंदोलनाला आणखी एक मोठा सेलिब्रिटी पाठिंबा मिळाल्याचे मानले जात आहे. सोशल मीडियावर तिच्या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अनेक कलाकारांनी व्यक्त दिला पाठिंबा

या आंदोलनाला केवळ आलिया आणि सलमानच नव्हे, तर चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील अनेक कलाकारांनी समर्थन दिले आहे. प्रकाश राज, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

याशिवाय सोनू सूद, वीर दास, दिया मिर्झा, सोहा अली खान, अदिती राव हैदरी, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, राजकुमार राव, विशाल ददलानी, स्वरा भास्कर, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, नंदिता दास, आयुष शर्मा, नसीरुद्दीन शाह, हृतिक रोशन आणि पटकथालेखिका सुतापा सिकदर यांसह अनेकांनी सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

संवादातून तोडगा निघण्याची अपेक्षा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असताना, अनेक कलाकारांनी सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्यासाठी पारदर्शकता, निष्पक्ष चौकशी आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT