Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt: 'अगं किती खोटं बोलशील...' आलिया भट्टने राहाबद्दल केलेली पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Alia Bhatt: असे तिने या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Alia Bhatt Shares gift from Raha

नुकताच ८ मार्चला महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी विविध स्वरुपात शुभेच्छा दिल्या आहेत. आता आलिया भट्टने यानिमित्ताने शेअर केलेल्या फोटोमुळे ती मोठ्या चर्चेत आली आहे.

आलिया भट्टने एक हृदयाच्या आकाराचा लाल वस्तूचा फोटो शेअर केला आहे. 'माझ्या लहान मुलीने हे माझ्यासाठी बनवले आहे. आणि मी ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा. हा दिवस साजरा करण्यासाठी आज थोडा वेळ काढा. असे तिने या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आलियाच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. एका यूजरने लिहिले की, 'एवढी छोटी मुलगी कसं काय बनवू शकते? इतकं खोटं बोलू नका .' एका यूजरने लिहिले की, 'रेहा इतकी मोठी झाली आहे की ती हे सर्व करू शकते?' एकजण म्हणाला, राहाला शिवणकाम येतं का? 2 वर्षाची मुलगी हे कसे करू शकतो? कोणी समजावून सांगू शकेल का? फक्त उत्सुकतेपोटी विचारतोय, असे त्याने म्हटले आहे.

रणबीर कपूरची मुलगी राहा 6 नोव्हेंबर 2023 रोजी एक वर्षाची झाली. आणि 25 डिसेंबर 2023 रोजी या जोडप्याने संपूर्ण जगाला तिचा चेहराही दाखवला होता. राहा अनेकदा आपल्या सौदर्यामुळे चर्चेत असते. आता आलिया चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT