Alia Bhatt Social Media
मनोरंजन

Alia Bhatt: '१२ वी फेल' चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव! आलिया भट्ट म्हणाली, खूप दिवसानंतर...'

Alia Bhatt: आलियाने खूप दिवसांनी मी एक सुंदर चित्रपट पाहिला आहे असे म्हणत विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर यांचेही कौतुक केले आहे.

दैनिक गोमन्तक

Alia Bhatt: १२ वी फेल हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर कलाकार मंडळीसुद्धा स्वत:ला कौतुक करण्यापासून रोखू शकत नसल्याचे आता समोर येत आहे. आलिया भट्टनेदेखील चित्रपटाचे आणि यामध्ये ज्या कलाकारांनी मनोज आणि श्रद्धा यांच्या भूमिका साकारल्या आहेत त्यांचे कौतुक केले आहे. आलियाने खूप दिवसांनी मी एक सुंदर चित्रपट पाहिला आहे असे म्हणत विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर यांचेही कौतुक केले आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलीवू़डची क्वीन कंगना रणौतनेदेखील दिग्दर्शक आणि टीमचे कौतुक केले आहे. विक्रांतच्या अभिनयाने प्रभावित झाले असून येत्या काही दिवसात तो इरफान खान यांची जागा घेऊ शकतो असेही म्हटले होते.

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. विक्रांत मेस्सीचा १२ वी फेल चित्रपट चित्रपटगृहात आला होता तेव्हा या चित्रपटाने सामान्य प्रेक्षकांचे मन जिंकले होते. ज्या पद्धतीने आयपीएस अधिकारी यांच्या जीवनाची कहाणी या कथेतून मांडली आहे, ही कहाणी आणि अभिनेत्यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या होत्या.

12वी फेल'मध्ये विक्रांत मेस्सीने खऱ्या आयुष्यातील आयपीएस अधिकारी मनोज कुमारची भूमिका साकारली होती आणि मेधा शंकर त्याची पत्नी आणि आयआरएस अधिकारी श्रद्धाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात मनोज कुमार यांचा गरिब परिस्थितीतून ते आयपीएस अधिकारी होण्याचा प्रवास दाखवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT