Gangubai Kathiawadi Movie Dainik Gomantak
मनोरंजन

गंगूबाई आली रे Netflixवर, आजपासून प्रेक्षकांसाठी चित्रपट OTTवर प्रदर्शित

गंगुबाई काठियावाडी ओटीटीवर प्रदर्शित व्हावा अशी निर्मात्यांची इच्छा होती

दैनिक गोमन्तक

चालु वर्षीचा बॉलीवूडमधील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi). मात्र विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा गंगुबाईला मोठा धक्का बसला. आता नेटफ्लिक्सनं मोठा निर्णय घेतला असून हा चित्रपट ओटीटीवर आजपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सकडून ही माहिती देण्यात आली आहे. शंभर कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आलियाच्या (Alia Bhatt) गंगुबाईचाही समावेश करण्यात आला होता. (Gangubai Kathiawadi on NetFlix)

नुकताच प्रदर्शित झालेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट ओटीटीवर आगपाखड करण्यासाठी सज्ज झाला आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर चांगलीच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील सर्वांची आवडती अभिनेत्री आलिया भट्टच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते . या चित्रपटात अभिनेत्रीने एक अशी व्यक्तिरेखा साकारली आहे जी करायला प्रत्येकजण कचरतो. पण, आलियाने या चित्रपटात कामाठीपुरा का चांद नावाच्या वेश्येतून सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका साकारली आणि प्रक्षकांची दाद मिळवली.

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. मोठ्या पडद्यावर धमाल केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित होत आहे. आता ज्यांनी आलियाचा हा चित्रपट पाहिला नाही ते घरबसल्या नेटफ्लिक्सवर याचा आनंद घेऊ शकतात. काही वेळापूर्वी नेटफ्लिक्सने पोस्ट करून ही माहिती दिली. नेटफ्लिक्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून याची पुष्टी करण्यात आली आहे. या माहितीसोबतच नेटफ्लिक्सने या चित्रपटाचा एक व्हिडिओही जारी केला होता- 'बघा...बघा चंद्र नेटफ्लिक्सवर येत आहे.' अशा कॅप्शनसह ही पोस्ट करण्यात आली होती, चित्रपटातील हे गाणेही लोकांना खूप आवडले. आलियाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 130 कोटींचा व्यवसाय केला हे सर्वांनाच माहिती आहे.

आजकाल गंगूबाई काठियावाडी हा असाच एक चित्रपट आहे जो रिलीजच्या आठव्या आठवड्यातही थिएटरमध्ये आपला जलवा दाखवत आहे. कोविड-19 महामारीमुळे चित्रपटगृहे काही काळ बंद होती. त्यामुळे अनेक चित्रपट थेट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. सिनेमागृहे पुन्हा सुरू झाल्यानंतरही काही ठिकाणी ही समस्या कायम आहे.

हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित व्हावा अशी निर्मात्यांची इच्छा होती

बहुतेक निर्माते चार आठवड्यांच्या आत त्यांच्या चित्रपटांचे डिजिटल प्रीमियर करण्याचा आग्रह धरत आहेत. OTT प्लॅटफॉर्मसह, त्यांचा व्यवसाय अधिक चांगला होऊ शकतो यासाठी निर्मात्यांचे प्रयत्न असतात. जेणेकरुन निर्मात्यांना थिएटरचे नुकसान किंवा कमी नफा भरून काढण्यासाठी काही मदत मिळू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT