Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt's New House: क्या बात है यार ! आलिया भट्टच्या नव्या घराबद्दल काय बोलावं?... घराची किंमत ऐकुनच धक्का बसेल

Rahul sadolikar

Alia Bhatt's New House: आलिया भट्ट कालपासुन फिल्मफेअरसाठी नॉमिनेशन मिळाल्यामुळे चर्चेत आहे. पण आता आलियाच्या नव्या घराची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिची सर्व कमाई घर खरेदीसाठी खर्च करत असल्याचे दिसते. या महिन्यात तिने आपली बहीण शाहीन भट्ट हिला कोट्यवधी रुपयांचे दोन फ्लॅट्स भेट म्हणून दिले. 

आता बातम्या येत आहेत की आलियाने बांद्रा पश्चिम येथे आणखी एक नवीन घर घेतले आहे ज्याची किंमत 37 कोटी रुपये आहे. आलियाचे नवीन घरही 'कृष्णा राज बंगला'मध्ये बनवले जात आहे.

आलिया भट्टने वांद्रे पश्चिम येथे 2,497 चौरस फुटांचे नवीन घर खरेदी केले आहे ज्याची किंमत 37.80 कोटी रुपये आहे. हे घर तिच्या प्रोडक्शन हाऊस 'इटर्नल सनशाईन प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड' ने विकत घेतले आहे.

 मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा नवीन पत्ता पाली हिलमधील एरियल व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड येथे आहे.मिळालेल्या माहितीनुसार त्याने 2.26 कोटी रुपयांचे स्टँप ड्युटी भरल्याची माहिती आहे. हा विक्री करार 10 एप्रिल 2023 रोजी रजिस्टर केला आहे.

याशिवाय 10 एप्रिल रोजी आलिया भट्टने तिची बहीण शाहीन महेश भट्टला मुंबईत 7.68 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट गिफ्ट केले होते. 

जुहूच्या गिगी अपार्टमेंटमध्ये असलेला हा फ्लॅट 2,086.75 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. या व्यवहारात मुद्रांक शुल्कासाठी 30.75 लाख रुपयांचा व्यवहार केला गेल्याची माहिती आहे.

आलिया सध्या पती रणबीर कपूर आणि मुलगी राहासोबत पाली हिल, बांद्रा येथील 'वास्तू'मध्ये राहते. या घराच्या बाल्कनीमध्ये या जोडप्याने लग्न केले, जिथे फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अनेकदा कृष्णा राज बंगल्याच्या बांधकाम साइटला भेट देतात. तेथे त्यांचे आठ मजली स्वप्नातील घर बांधले जात आहे. दोघेही नंतर या घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT