Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

World's Best Influencers : लग्न झाल्यावर आलिया भट्टला मिळाली ही 'गुड न्यूज'

Alia Bhatt Become Worlds Best Influencers : चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

दैनिक गोमन्तक

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाला दहा दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. बॉलीवूडची ही सर्वात लोकप्रिय जोडी पुन्हा आपापल्या कामावर परतली आहे. रणबीर कपूरने रश्मिका मंदान्नासोबत 'अॅनिमल' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे, तर आलिया भट्टही तिच्या स्वत:च्या प्रोजेक्टवर काम करत आहे. अशा रीतीने फुरसतीचा वेळ एकत्र घालवण्याऐवजी या जोडप्याने आपल्या कामाला प्राधान्य दिले आहे. मात्र याच दरम्यान नववधू आलिया भट्टसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ही आनंदाची बातमी आलिया भट्टसाठीच नाही तर तिच्या चाहत्यांसाठीही आहे. (Alia Bhatt Become Worlds Best Influencers)

आलिया भट्टने इंस्टाग्रामवर सिनेजगतातील टॉप इन्फ्लुएंसर्समध्ये स्थान मिळवले आहे. जगभरातील या टॉप 5 इन्फ्लुएंसर्सच्या यादीत आलिया भट्ट ही एकमेव भारतीय आणि आशियाई कलाकार आहे. टॉप 5 च्या या क्रमवारीत आलिया भट्ट चौथ्या स्थानावर आहे. या यादीत हॉलिवूड स्टार झेंडाया पहिल्या क्रमांकावर आहे, तर टॉम हॉलंड दुसऱ्या क्रमांकावर, विल स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आणि जेनिफर लोपेझ पाचव्या क्रमांकावर आहे.

'RRR' आणि 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये दिसल्यानंतर आलिया भट्ट आता लवकरच हॉलिवूड चित्रपटात पदार्पण करणार आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' असे या आंतरराष्ट्रीय स्पाय थ्रिलर चित्रपटाचे नाव आहे. यात तिच्यासोबत गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन दिसणार आहेत. अशाप्रकारे आता ती बॉलीवूड ते ग्लोबल स्टार बनणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT