'KGF 2’ 300 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, 'बाहुबली 2'चा तोडला रेकॉर्ड

300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'बाहुबली 2' नंतर हिंदीत डब केलेला 'KGF 2’ हा दुसरा दाक्षिणात्य चित्रपट आहे.
KGF 2
KGF 2Dainik Gomantak
Published on
Updated on

'पुष्पा' आणि 'RRR' नंतर, संपूर्ण भारतात 'KGF Chapter 2' ने बॉक्स ऑफिसवर राज करत आहे. साऊथ स्टार यशच्या 'KGF 2' च्या हिंदीभाषेमध्ये 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक रमेश बाला (Ramesh Bala) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, 'KGF 2' च्या हिंदी व्हर्जनने भारतीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'बाहुबली 2' नंतर हिंदीत डब केलेला हा दुसरा दक्षिणात्य चित्रपट (South Movie) आहे. (KGF 2 latest news)

रमेश पुढे म्हणाले की, 'KGF 2' हा 300 कोटी रुपये कमावणारा दहावा हिंदी चित्रपट (Movie) ठरला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 11 दिवसांत हा विक्रम गाजवला आहे. 'पीके', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान', 'दंगल', 'टायगर जिंदा है', 'पद्मावत', 'संजू', 'वॉर' आणि 'बाहुबली 2' हे 300 कोटींच्या क्लबमधील हिंदी चित्रपट आहेत. तसेच चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने दोन दिवसांत 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

KGF 2
'लाल सिंग चड्ढा’ नंतर 'या' चित्रपटात झळकणार आमिर खान

'KGF 2' मध्ये यश मुख्य भूमिकेत आहे. प्रशांत नीलने याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन देखील आहेत. दोन दशकांनंतर ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसली आहे. यात मालविका अविनाश आणि श्रीनिधी शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com