Akanksha Chaudhary Lock Upp 2 Casting Couch Revelation Dainik Gomantak
मनोरंजन

Akanksha Chaudhary: ''महिन्यातून 5-6 वेळा शरीरसंबंध ठेव'', 'लॉक अप 2 शो'मध्ये आकांक्षाचा धक्कादायक खुलासा; कास्टिंग काऊचचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!

Akanksha Chaudhary Lock Upp 2 Casting Couch Revelation: रिॲलिटी शो 'लॉक अप 2'च्या मंचावरुन एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारा खुलासा समोर आला.

Manish Jadhav

Akanksha Chaudhary Lock Upp 2 Casting Couch Revelation: रिॲलिटी शो 'लॉक अप 2'च्या मंचावरुन एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारा खुलासा समोर आला, ज्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरवून सोडले. शोमधून बाहेर पडताना स्पर्धक आकांक्षा चौधरी हिने तिच्या आयुष्यातील अत्यंत खळबळजनक खुलासा केला. ब्यूटी पॅजंटच्या दिवसांत एका ज्येष्ठ आणि नामांकित व्यक्तीने मदतीच्या बदल्यात तिच्यासमोर एक अट ठेवली होती, याची वेदनादायी कहाणी शोमध्ये तिने सांगितली. दरम्यान, 'बिग बॉस' फेम बंदगी कालरा हिच्या एका ट्विटमुळे या संपूर्ण प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले.

आकांक्षाने अत्यंत भावूक होऊन सांगितले की, जेव्हा ती ब्यूटी पॅजंटची तयारी करत होती, तेव्हा तिच्याकडे कपडे आणि ट्रेनिंगसाठी पैसे नव्हते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिने या क्षेत्रातील एका अत्यंत वरिष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तीकडे मदत मागितली. ती व्यक्ती अनेक वर्षांपासून ब्यूटी पॅजंट्समध्ये जज म्हणून काम करत होती आणि नवोदित कलाकारांना मदत करण्यासाठी ओळखली जात होती. आकांक्षाने त्यांच्याकडे आर्थिक मदतीची विनंती केली आणि बदल्यात त्यांच्या कंपनीत काम करण्याची तयारी दर्शवली; मात्र पुढे जे घडले त्याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

आकांक्षाने सांगितले केले की, त्या व्यक्तीने मदत करण्याऐवजी तिच्याशी असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. विरोध करुनही त्याने तिचे शोषण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आकांक्षाने त्याचा हात झटकला, तेव्हा त्याने अत्यंत निर्लज्जपणे अट ठेवली की, जर ती महिन्यातून 5 ते 6 वेळा त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवेल, तरच तो तिला स्पॉन्सर करेल. या धक्कादायक खुलाशाने शोमधील सहकारी हक्काबक्का राहिले.

या घटनेनंतर बंदगी कालराने 'एक्स'वर एक पोस्ट करत दावा केला की, आकांक्षा ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे, त्याला ती ओळखते. या व्यक्तीविषयी कोणीही उघडपणे बोलत नाही हे दुर्दैवी असून, त्याची एक मिस्ट्रेस मुंबईत (Mumbai) तिच्याच इमारतीत राहते असा दावाही बंदगीने केला. नेटकऱ्यांनी त्या पॉवरफुल व्यक्तीचे नाव विचारले असता, बंदगीने नाव उघड करण्यास नकार दिला, मात्र ती व्यक्ती साजिद खान नाही हे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT