Salman Khan: "सलमान आणि मी एकत्र नग्न होऊन आंघोळ केलीय पण...", भाईजानच्या खास फ्रेंडने केला धक्कादायक खुलासा

Salman Khan And I Bathed Naked Together Old Friend Statement: सलमान खान आजही अनेकांसाठी एक न उलगडलेलं कोडं असला, तरी राजू यांच्या मते सलमान हा अत्यंत मोकळ्या मनाचा आणि कधीही हिशोबी वृत्तीने न वागणारा माणूस आहे.
Salman Khan And I Bathed Naked Together Old Friend Statement
Master Raju and Salman Khan FriendshipDainik Gomantak
Published on
Updated on

Master Raju and Salman Khan Friendship: बॉलिवूडमधील मैत्रीचे किस्से नेहमीच चर्चेत असतात, पण सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा बालपणीचा मित्र मास्टर राजू (राजू श्रेष्ठ) यांची मैत्री काळानुरुप बदलली असली, तरी तिची वीण आजही घट्ट आहे. वांद्रे (Bandra) येथील एकाच परिसरात लहानाचे मोठे झालेल्या या दोन मित्रांच्या आठवणींना मास्टर राजू यांनी अलीकडेच उजाळा दिला.

सलमान खान (Salman Khan) आजही अनेकांसाठी एक न उलगडलेलं कोडं असलं, तरी राजू यांच्या मते सलमान हा अत्यंत मोकळ्या मनाचा आणि कधीही हिशोबी वृत्तीने न वागणारा माणूस आहे. ज्या काळात राजू हे 'मास्टर राजू' म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होते, तेव्हा सलमानची ओळख केवळ 'राजूच्या बाजूला उभा असलेला एक मुलगा' अशी होती. आज सलमान एक जागतिक स्तरावरचा मेगास्टार असला, तरी त्यांच्या मैत्रीतील तो जुना काळ आजही राजू यांच्या मनात जिवंत आहे.

राजू यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अनेक रंजक किस्से सांगितले. 1972 च्या 'बागी' चित्रपटात एकत्र काम करण्यापूर्वीच ते एकमेकांना ओळखत होते. ते दोघे वांद्रे परिसरात एकत्र सायकलिंग करायचे. जेव्हा सलमान 'पत्थर के फूल' चित्रपटासाठी तयारी करत होता, तेव्हा बँडस्टँडवर राजू सायकल चालवत असताना सलमान त्यांच्या सायकलच्या कॅरियरला पकडून स्केटींगचा सराव करायचा. विशेष म्हणजे, बालपणीच्या मजामस्तीचा भाग म्हणून सलमान आणि मी एकत्र नग्न होऊन आंघोळ केल्याचे देखील राजू यांनी सांगितले.

सलमानने 'बागी' चित्रपटात स्वतः पुढाकार घेऊन राजूला भूमिका मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांनी 'चल मेरे भाई'मध्येही एकत्र काम केले. सलमानच्या यशानंतर राजू यांनी त्याला 'तू' ऐवजी 'भाई' किंवा 'आप' म्हणायला सुरुवात केली. यावर सलमानने त्यांना अडवले देखील होते, पण राजू यांच्या मते, एका बड्या स्टारचा सन्मान राखण्यासाठी हा बदल महत्त्वाचा होता.

Salman Khan And I Bathed Naked Together Old Friend Statement
Salman Khan Net Worth: गॅलेक्सी अपार्टमेंट, ऑडी-मर्सिडीज आणि बरंच काही... बॉलीवूडच्या 'भाईजान'ची एकूण संपत्ती किती? आकडे पाहून व्हाल हैराण

सलमानच्या आयुष्यातील वादग्रस्त टप्प्यांवरही राजू यांनी मोकळेपणाने भाष्य केले. 19898 च्या काळवीट शिकार प्रकरणादरम्यान सलमान प्रचंड मानसिक तणावाखाली होता. जरी तो चेहऱ्यावर तसे दाखवत नसला, तरी त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा वकिल फी आणि कोर्टाच्या चकरांमध्ये जात होता. सलमानने राजू जवळ आपली निरापराधता सिद्ध करण्यासाठी होत असलेल्या त्रासावर अनेकदा खेद व्यक्त केला होता.

तसेच, सलमानच्या रागीट स्वभावाचे समर्थन करताना राजू म्हणाले की, सलमान कधीही डोक्याने विचार करत नाही, तो नेहमी मनाचे ऐकतो. आपल्या भावनांवर नियंत्रण नसल्यामुळेच त्याने कधी प्रेयसीच्या इमारतीखाली जाऊन आरडाओरडा केला, तर कधी कोणाशी वाद घातले. तो स्वभावाने स्वच्छ आणि साधा आहे, म्हणूनच अनेकदा तो चुकीच्या पद्धतीने समजला गेला.

Salman Khan And I Bathed Naked Together Old Friend Statement
Salman Khan Goa Property: सलमान खानच्या गोव्यातील मालमत्तेवर टांगती तलवार; CRZ नियमांच्या उल्लंघनावरुन हायकोर्टात याचिका दाखल!

राजू यांच्या मते, सलमान खान हा एक असा मित्र आहे जो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही आपल्या जुन्या ओळखी विसरलेला नाही. जरी आज राजू सलमानच्या घरी किंवा सेटवर सतत जात नसले, तरी त्यांच्यातील मैत्रीचे नाते आजही कायम आहे. एका बाजूला सलमानची वादग्रस्त प्रतिमा आणि दुसरीकडे राजूंनी मांडलेला हा हळवा सलमान, यामुळे चाहत्यांना आपल्या लाडक्या 'भाईजान'चे एक वेगळे पैलू पाहायला मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com