Adipurush Teaser Out Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush चा टीझर रिलीज... प्रभू रामाच्या अवतारात प्रभास

Adipurush Teaser Out: सोशल मीडियावर युजर्स प्रभासच्या नव्या लूकवर कमेंटचा वर्षाव करत आहे.

दैनिक गोमन्तक

साऊथ स्टार प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) चा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या झलकमध्ये प्रभास भगवान रामाच्या अवतारात आहे. अभिनेता सैफ अली खानला रावणाच्या रुपात पाहून प्रेक्षकांच्या मनात भीती जागृत होईल. साऊथच्या या पॅन इंडिया चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत होते जे आता संपले आहे. प्रभू रामाची नगरी अयोध्येत आयोजित एका भव्य समारंभात निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर आणि भव्य पोस्टर रिलीज केले आहे. प्रभास आणि क्रिती सॅननसह चित्रपटाची संपूर्ण टीम अयोध्येला पोहोचली. तिथेच निर्मात्यांनी आदिपुरुषचा टीझर रिलीज केला.

आदिपुरुषच्या टीझरबद्दल बोलताना, व्हिडिओ (Video) सुरू होताच, पार्श्वभूमीत प्रभासचा आवाज आणि VFX सह त्याचा रामावतार आहे. 'ही पृथ्वी बुडली किंवा हे आकाश तुटले तर अन्यायाचे सर्वनाश न्यायाच्या हाती असेल. मी येतोय, न्यायाच्या दोन पायांनी अन्यायाची दहा डोकी चिरडायला येतोय. मी अधर्माचा नाश करायला आलो आहे. टीझरच्या (Teaser) शेवटी, जय श्री राम, जय श्री राम आणि राजा रामच्या जयघोषात. 

या चित्रपटात (Movie) सैफ अली खान 'दशानन' म्हणजेच रावणची भूमिका साकारत आहे.  या भूमिकेसाठी सैफने खूप मेहनत घेतली आहे. त्याची एक झलक पाहून चाहत्यांनमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT