Adipurush  Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush: 'आदिपुरुष' पुढे नवे संकट! हिंदू सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतली न्यायालयात धाव

Adipurush: चित्रपटातील पात्रे ही धार्मिक चरित्रांच्या एकदम उलट आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Adipurush: चित्रपटाचा टीझर रिलिज झाल्यापासून चाहते आदिपुरुष च्या रिलिज होण्याची आतुरतेने वाट बघत होते. प्रेक्षकांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. शुक्रवारी चित्रपट रिलिज झाल्यानंतर थिएटरमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शोचा अनेकांनी आनंद घेतला आहे.

सुपरस्टार प्रभास, बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि ओम राऊत यांनी डायरेक्ट केलेल्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यानंतर मात्र चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

काहींनी चित्रपटाने अपेक्षाभंग केल्याचे म्हटले तर काहींनी कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. आता मात्र आदिपुरष समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

चित्रपट रिलिज झाल्यानंतर हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष्यांनी दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. याआधी नेपाळने एका डायलॉगमुळे चित्रपटाला विरोध केला होता. ( सीता भारताची मुलगी आहे. ) आता हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष्यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करत म्हटले आहे की, या चित्रपटाला कोणतेही सर्टिफिकेट मिळू नये.

जनहित याचिका दाखल करताना हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष्य विष्णू गुप्तांनी म्हटले आहे की, या चित्रपटाने रामायण, देव , भारताच्या संस्कृतीची थट्टा उडवली आहे.

याशिवाय, राम, सीता , हनुमान आणि रावण यांच्याविषयी काही आक्षेपार्ह सीनदेखील चित्रपटातून काढण्यासाठी आदेश देण्यात यावेत अशी विनंती त्यांनी दिल्ली हायकोर्टाला दिली आहे. चित्रपटातील पात्रे ही धार्मिक चरित्रांच्या एकदम उलट आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, चित्रपटातील संवाद निराशा करत असून अत्यंत सुमार दर्जाची भाषा वापरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. याबरोबरच, व्हीएफएक्सचा देखील प्रभावीपणे वापर करता आला नाही यापेक्षा पबजी बरे अशा शब्दात प्रेक्षकांनी टीका केली आहे.

आता दिल्ली हायकोर्ट यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता आदिपुरुष बॉक्स ऑफीसवर किती कमाई करण्यात यशस्वी होणार हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT