Shivangi Joshi  Dainik Gomantak
मनोरंजन

Shivangi Joshi : ही प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री किडनीच्या विकाराने झालीय त्रस्त..कसा होतो किडनीचा विकार?

टेलिव्हिजन विश्वाची ही प्रसिद्ध अभिनेत्री किडनीच्या विकाराने त्रस्त असल्याची बातमी सध्या समोर आली आहे.

Rahul sadolikar

Actress Shivangi Joshi Suffring from Kidney Disease: टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी हिला किडनीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. किडनीचे मुख्य कार्य म्हणजे रक्त स्वच्छ करणे आणि शरीरातील अनावश्यक भाग काढुन टाकणे हे अत्यंत महत्त्वाचं काम किडनीद्वारे होत असतं...

रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि लाल रक्तपेशी निर्माण करण्यास तसेच शरीरातील पीएच पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. किडनीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते.

किडनीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. अशा परिस्थितीत या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आणि वेळेत या आजारापासून मुक्ती मिळवणे महत्त्वाचे आहे

मूत्रपिंडाचा संसर्ग हा एक प्रकारचा मूत्रमार्गाचा संसर्ग आहे. मूत्रपिंडाचा संसर्ग मूत्रमार्गात किंवा शरीराबाहेर मूत्र वाहून नेणाऱ्या नळीमध्ये होऊ शकतो. किडनी इन्फेक्शनची समस्या एक किंवा दोन्ही किडनीमध्ये असू शकते.

या मूत्रपिंडाच्या समस्येला पायलोनेफ्रायटिस असेही म्हणतात. किडनी इन्फेक्शनच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास बॅक्टेरिया संपूर्ण शरीरात पसरतात आणि त्यामुळे किडनीलाही नुकसान होऊ शकते. किडनीच्या संसर्गाची समस्या अँटिबायोटिक्सद्वारे बरी होऊ शकते.

किडनीचे मुख्य कार्य शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे आहे. पण जेव्हा किडनी नीट काम करणे थांबवते तेव्हा शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत, त्यामुळे शरीरातील ऊतींमध्ये पाणी आणि मीठासोबत विषारी पदार्थ तयार होऊ लागतात. शरीरात या सर्वांची पातळी वाढल्यामुळे चेहरा, पाय आणि डोळ्याभोवती सूज येऊ लागते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT