Rana Daggubati : "मला उजव्या डोळ्याने दिसत नाही, माझी किडनीही ट्रान्सप्लांट केलीय"! साऊथच्या सुपरस्टारच्या वेदना

साऊथच्या एका अभिनेत्याने आपल्या शारिरीक वेदनांची माहिती देताच चाहत्यांना धक्का बसला आहे.
Rana Daggubati 
Vyankatesh
Rana Daggubati VyankateshDainik Gomantak

Rana Daggubati Talking About his Kidney Transplant : राजामौलींचा बाहुबली या चित्रपट कोण विसरेल? या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटात भल्लालदेव हे पात्र साकारणाऱ्या राणा दग्गुबत्तीची सध्या चर्चा सुरूय.

एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली'मध्ये भल्लालदेवची भूमिका करून आपला ठसा उमटवणारा दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबती सध्या त्याच्या पहिल्या वेब सीरिज 'राणा नायडू'मुळे चर्चेत आहे. ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. 

नुकताच त्याने कॉर्निया आणि किडनी प्रत्यारोपणाबाबत खुलासा केला. तो म्हणाला की त्याला त्याला उजव्या डोळ्याने दिसत नाही आणि अर्धवट अंधत्वाचा सामना कसा झाला हे देखील सांगितले.

राणा दग्गुबती म्हणाला, 'मला माझ्या उजव्या डोळ्याने दिसत नाही, त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने काम करतो. अनेकांना शारिरीक त्रासामुळे तुटून पडते आणि ती बरी झाली तरी जडपणा कायम असतो.

 माझे कॉर्नियल प्रत्यारोपण झाले आहे, माझे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहे, त्यामुळे जवळजवळ मी टर्मिनेटर असल्यासारखे आहे. मला वाटायचं, 'चला, मी अजून जिवंत आहे आणि तू फक्त पुढे जात राहायचं.'

2016 मध्ये राणा दग्गुबती यांनी अर्धवट अंध असल्याबद्दल खुलासा केला होता. तो म्हणाला की तो उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही. आता राणाने त्याच्या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला वाटते की कॉर्नियल ट्रान्सप्लांटबद्दल बोलणाऱ्या काही लोकांपैकी मी एक आहे. 

कारण एक मूल होतं ज्याच्या आईचा डोळा गेला होता आणि तो त्याबद्दल खूप दुःखी होता. आणि मी त्याला सांगितले काय आहे ते काही विशेष नाही. प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते आणि मग मी माझ्या डोळ्याबद्दल सांगितले. मी माझ्या उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही, म्हणून मी वेगळ्या दृष्टीकोनातून काम करतो.'

Rana Daggubati 
Vyankatesh
Prabhas Viral Photo : "दारु आणि सिगारेटचा हा परिणाम आहे" प्रभासच्या या व्हायरल फोटोवर अतरंगी कमेंटस

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या राणा नायडूमध्ये राणा दग्गुबती दिसला होता. त्याने अंकल व्यंकटेश दग्गुबातीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. राणा आणि व्यंकटेश व्यतिरिक्त यात सुरवीन चावला देखील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com