Sonu Sood Shares Video from America : अभिनेता सोनू सूद हा नेहमीच सर्वसामान्य लोकांंमध्ये वावरणारा जमीनीवरचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. कोविडच्या काळात सोनूने स्थलांतरित मजूरांची मदत करण्यासाठी केलेल्या नियोजनासाठी आजही सोनूचं कौतुक केलं जातं.
सध्या अभिनेता सोनू सूद अमिरेकेच्या दौऱ्यावर आहे. जेव्हा जेव्हा सोनू प्रवासात असतो तेव्हा तो सामान्य लोक,व्यावसायिक आणि मजुरांना भेटुन त्यांच्याशी संवाद साधत असतो.
त्याचे व्हिडीओही तो सोशल मिडीयावर पोस्ट करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो एका ऊसाचा रस विकणाऱ्या भारतीय व्यावसायिकाशी संवाद साधताना दिसत आहे.
या व्हिडीओत सोनू अमेरिकेतल्या त्या भारतीय व्यावसायिकाशी संवाद साधताना ऊसाच्या या मशिनबद्दल आश्चर्य व्यक्त करतो. व्हिडीओच्या सुरुवातीला बोलताना सोनू म्हणतो आजवर आपण भारतात उसाचा रस प्यायला असाल पण आज पाहुया अमेरिकेतला उसाचा रस.
सोनू पुढे जातो आणि त्या भारतीय व्यक्तीशी बोलायला सुरूवात करतो. हे मशीन अजिबात आवाज करत नाही यांचं आश्चर्यही सोनूने व्यक्त केलं आहे.
सोनूच्या व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण हा हरियाणाचा असुन त्यांचं नाव विजेंदर असं आहे. सोनूच्या या व्हिडीओमध्ये तरुणाला सोनूने त्याची विचारपूस केल्यानंतर झालेला आनंद स्पष्ट जाणवत होता.
काही दिवसांपूर्वी सोनूने चप्पल दुरुस्त करणाऱ्या एका सामान्य व्यक्तीचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला होता. सोशल मिडियावर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती. या पोस्ट केल्यानंतर 1लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले होते.
कोरोनाच्या काळात अनेक जनसामान्य संकटात असताना सोनू सूदने उचललेले पाऊल कौतुकास्पद होते. त्याच्या मदतीने अनेकांना जगण्याचा नवीन मार्ग मिळू शकल्याच्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या गेल्या.