Subhedar Marathi Movie : छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमी मावळ्याची गोष्ट मराठी इंडस्ट्रीत सुपरहिट ठरलीय

मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार हा चित्रपट सध्या चांगलाच हिट होताना दिसत आहे.
Subhedar Movie
Subhedar MovieDainik Gomantak
Published on
Updated on

Subhedar Marathi Movie : सध्या मराठी सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगली हवा आहे. गेल्या काही महिन्यात मराठी सिनेमा वेड, बाईपण बारी देवा यांसारख्या सिनेमांनतर आता आणखी एक सिनेमाचं वादळ बॉक्स ऑफिसवर घोंघावत आहे.

सुभेदार

मराठी इंडस्ट्रीत सध्या सुभेदार हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगतो... गड आला पण...' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आता या सिनेमाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लेखन- दिग्दर्शनाचं कौतुक

लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर हे पुन्हा एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासाच्या काळात नेण्यात ते यशस्वी झाले आहेत.

चहूबाजूंनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रेक्षकही प्रचंड उत्साहात 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत 'सुभेदार' सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये एकच गर्दी करत आहेत.

सुभेदार चित्रपट कुणाची कथा सांगतो?

'सुभेदार' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तान्हाजीराव मालुसरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. या चित्रपटाचा विषय केवळ किल्ले कोंढाण्यापुरता मर्यादित नसून, सुभेदार मालुसरेंच्या यांच्या पात्राची ओळख शिवभक्तांना हा सिनेमा करुन देत आहे.

चित्रपटाला तुफान गर्दी

या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच जल्लोष केला आहे. हातात भगवा झेंडा घेत प्रेक्षक शिवरायांच्या घोषणा देत आहेत.

अष्टकातल्या 5 व्या चित्रपटाला मिळेल प्रतिसाद

शिवराज अष्टकातल्या म्हणजेच आठ चित्रपटातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या चारही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होत आता त्यातच यातील पाचवा भाग यशानंतर आता शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प 'सुभेदार' या चित्रपटाला देखील तसाच प्रतिसाद प्रेक्षकांचा पहायला मिळत आहे.

या सिनेमाने पहिल्या दिवशी 1.2 कोटींची आणि दुसऱ्या दिवशी 1.75 कोटींची कमाई केली आहे. तर आता या चित्रपटाची एकून कमाई 2.80 कोटी इतकी झाली आहे.

Subhedar Movie
Rakhi Sawant : मी आता राखी नाही मला फातिमा म्हणा...ड्रामा क्वीनचा हा नवीन व्हिडीओ पाहा

चित्रपटात हे असतील कलाकार

सुभेदार सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com