Sonu Sood  Dainik Gomantak
मनोरंजन

Sonu Sood : मुलीसाठी गाणाऱ्या आईचा व्हिडीओ पाहुन सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर...

अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा मनाचा मोठेपणा दाखवत एका सामान्य महिलेचा सन्मान केला आहे

Rahul sadolikar

Sonu Sood gives big Offer to village women : अभिनेता सोनू सूद सध्या त्याच्या एका कृतीमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. पुन्हा एकदा तो मनाने मोठा असल्याचा परिचय आला आहे. त्याने ट्विट्टरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये ती महिला अतिशय मधुर आवाजात हे गाणे गात आहे. लोकांना या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे आणि लोक तो प्रचंड शेअरही करत आहेत. हाच व्हिडिओ शेअर करत अभिनेता सोनू सूदने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही लिहिले आहे – नंबर पाठवा माँ चित्रपटासाठी गाणार का? .

बॉलीवूड अभिनेता सोनू सूद कोरोनाव्हायरस साथीच्या काळात अनेकांसाठी मसिहा म्हणून उदयास आला. घरापासून लांब असणाऱ्या कित्येक लोकांना त्याने त्यांच्या घरी पोहोचवले

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवले होते. त्याच्या कामामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला गाणे गाताना दिसत आहे. त्या महिलेचे गाणे इतके व्हायरल झाले की, अभिनेता सोनू सूदनेही ते त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले. 

या व्हिडिओमध्ये ती महिला अतिशय मधुर आवाजात गाणं गात आहे, या गाण्याचे लोकांनी खूप कौतुक केले.कित्येक युजरनी हा व्हिडीओ शेअरही केला. या व्हिडिओमध्ये एक महिला चुलीवर रोट्या बनवताना दिसत आहे. महिलेची मुलगी तिला गायला सांगते, तेव्हा ती सुरूवातीला गायला नकार देते.

थोड्या वेळाने मुलीच्या सांगण्यावरून ती 'तेरे नैना सावन भादो' हे गाणं गाते. या गाण्यात महिलेच्या आवाजातला गोडवा युजर्सना भावुन गेला. महिलेचा आवाज एखाद्या पारंगत गायीकेसारखा आहे. 

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर कॅप्शनमध्ये लिहिले आहे - हे शक्य आहे का मधुरपणे, एक आई तिच्या मुलीच्या इच्छेनुसार गाते आहे. त्याच वेळी, तोच व्हिडिओ शेअर करताना, अभिनेता सोनू सूदने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे – नंबर पाठवा माँ चित्रपटासाठी गाणार आहे. 

करत आहेत, त्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक सतत कमेंट करताना दिसत आहेत. लोक त्या महिलेचे कौतुक करत कमेंट करत आहेत. याआधीही सोनू सूदने अनेकांना मदत केली आहे आणि त्यांना पुढे नेताना दिसले आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT