Shahrukh khan  Dainik Gomantak
मनोरंजन

किंग खान वाढवतोय टीम इंडियाचं मनोधैर्य...शेअर केली स्पेशल पोस्ट

अभिनेता शाहरुख खानने एक स्पेशल पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

Rahul sadolikar

Shahrukh Khan special post to motivate team india : वर्ल्डकप 2023 टीम इंडियाला रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनल मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीयांचे मन दु:खी झाले असतानाच काही सेलिब्रिटींनी टीम इंडियाला प्रोत्साहन दिले. शाहरुख खानने कुटुंबासह स्टेडियममध्ये सामना पाहिला. त्याने मध्यरात्री टीम इंडियासाठी एक पोस्ट शेअर केली.

कोट्यवधी भारतीयांची निराशा

टीम इंडियाला 2023 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने कोट्यवधी देशवासीयांचे मन दु:खी झाले होते, तर सेलिब्रिटींमध्येही निराशा होती. मात्र, निकालाकडे दुर्लक्ष करत स्टार्सनी टीम इंडियाला प्रोत्साहन दिले.

सामन्याला शाहरुखही उपस्थित

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळलेला सामना पाहण्यासाठी शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह आला होता . येथून परतल्यानंतर किंग खानने टीम इंडियासाठी एक गोड नोट पोस्ट केली. त्याने सर्व खेळाडूंसाठी काहीतरी लिहिले, जे लोकांच्या हृदयाला भिडले.

ऑस्ट्रेलियाचा विजय

ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आणि घरच्या मैदानावर सामन्याचा आनंद लुटणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर निराशा होती. 

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुले आर्यन आणि सुहानासोबत सामना पाहिला. टीम इंडियाच्या पराभवानंतर त्यांनी मायक्रो ब्लॉगिंग साइटवर त्यांच्यासाठी हृदयस्पर्शी संदेश लिहिला. किंग खानने 'मेन इन ब्लू'च्या प्रयत्नांचे आणि मेहनतीचे कौतुक केले.

शाहरुख लिहितो

शाहरुखने लिहिले, 'टीम इंडियाने ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धा खेळली ती अभिमानाची गोष्ट आहे. तो खेळ मोठ्या चिकाटीने खेळला. 

हा खेळ आहे आणि कधी चांगले दिवस येतात तर कधी वाईट दिवस. दुर्दैवाने आज हे घडले. पण क्रिकेटमधील तुमच्या खेळाच्या वारशाचा आम्हाला अभिमान वाटल्याबद्दल टीम इंडियाचे आभार. प्रेम आणि आदर. तुम्ही आम्हाला अभिमानी राष्ट्राचा भाग बनवता.

अनुष्काने दिला धीर

शाहरुख व्यतिरिक्त, सुनील शेट्टी, अजय देवगण , करीना कपूर, रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय यांच्यासह इतर अनेक स्टार्सनी देखील टीम इंडियाच्या उत्कृष्ट खेळाच्या रणनीतीचे कौतुक केले. पराभवाने उद्ध्वस्त झालेल्या विराट कोहलीला अनुष्का शर्माने मिठी मारून धीर दिला. या जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT