Pracheen Chauhan Dainik Gomantak
मनोरंजन

तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अभिनेता प्राचीन चौहान गजाआड

एकता कपूरच्या (Ekta Kapoor) लोकप्रिय ठरलेल्या 'कसोटी जिंदगी की' या मालिकेमधून टिव्ही जगतामध्ये पदर्पण केलेला अभिनेता प्राचीन चौहानला (Pracheen Chauhan) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

टेलिव्हिजनवरील प्रसिध्द अभिनेता पर्ल वी पुरीला (Pearl v Puri) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप पर्ल वर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) लोकप्रिय ठरलेल्या 'कसोटी जिंदगी की' या मालिकेमधून टिव्ही जगतामध्ये पदर्पण केलेला अभिनेता प्राचीन चौहानला (Pracheen Chauhan) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्राचीन चौव्हाणने तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

प्राचीन चौहानच्या विरोधात पीडीत तरुणीने मालाड पूर्व पोलिस (Malad East Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पिडीतेच्या तक्रारीवरुन कलम 352, 342, 323, 502 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस पुढील चौकशी करत असून प्राचीन चौहानच्या अटकेमुळे पुन्हा एकदा टिव्ही जगताला मोठा धक्का बसला आहे.

प्राचीनचे टीव्ही जगतामध्ये अनेक मित्र आहेत. मात्र अद्याप या प्रकरणी कोणत्याही कलाकाराची प्रतिक्रिया आलेली नाही. 'कसोटी जिंदगी की' या मालिकेमधून आपल्या अभिनयाची सुरुवात प्राचीनने केली होती. त्यानंतर त्याने सिंदूर तेरे नाम का सात फेरे', 'कुछ झुकी पलके' अशा मालिकांमधून चो झळकला होता.

दरम्यान सध्या प्राचीन यूट्यूबवरील प्रसिध्द शो शिट्टी आयडियाज ट्रेंडिंग मध्ये छवी मित्तल आणि पूजा गौरकेसोबत तो काम करतो. त्याच्या ''अभिमन्यू च्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजीमध्ये गोव्याची यशस्वी घोडदौड सुरु; अरुणाचल विरोधात कश्यपने झळकवले द्विशतक

Saint Francis Xavier Exposition: सोहळा तोंडावर, पण रस्त्याची दुरावस्थाच! जुने गोवे-पिलार मार्गावर खड्ड्यांचं 'प्रदर्शन'

Cash For Job Scam: वास्कोमधून 420चे आणखीन एक प्रकरण उघडकीस; 6 लाख लुबाडल्याने आई-मुलाला अटक

Verna: वेर्णा येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण रद्द; सुरक्षा व्यवस्थापन समिती बैठकीत निर्णय

खरी कुजबुज: गणेश गावकर नॉट रिचेबल

SCROLL FOR NEXT