कमाईच्या बाबतीत बॉलिवूडचे (bollywood) कलाकार दुसर्या क्रमांकावर नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अलीकडेच इंस्टाग्रामच्या रिचलिस्ट (Richlist of Instagram) 2021 ची नावे समोर आली आहेत. दोन भारतीयांनी यात प्रवेश केला आहे. या यादीत प्रियंका चोप्राला (Priyanka Chopra) 27 वे स्थान मिळाले असून विराट कोहली (Virat Kohli) 19 व्या स्थानावर आहे. प्रियांका चोप्रा इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असून ती त्यावर प्रोमोशनल पोस्टही करते. हे पोस्ट करण्यासाठी त्यांना प्रचंड रक्कम मिळते.(Priyanka Chopra once again joined Instagram Richlist earns so many crores from one post)
मनोरंजन जगात फक्त प्रियंका चोप्रानेच या यादीत आपले स्थान बनविले आहे. हॉपरपर्क.कॉमच्या (Hopperhq.com) वृत्तानुसार, इंस्टाग्राम रिच लिस्ट 2021 च्या टॉप 30 नुसार प्रियंका चोप्रा तिच्या प्रत्येक पोस्टसाठी कोट्यावधी रुपये घेते. मागील वर्षी या यादीत प्रियंका 19 व्या स्थानावर होती, ती घसरून 27 वर आली आहे.
वर्षातून एकदा या यादीमध्ये कलाकारांना आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. ही यादी इंस्टाग्रामवर जाहिरात पोस्टसाठी किती आकारते या आधारे तयार केली गेली आहे. इंस्टाग्रामवर प्रियंका चोप्राचे 64 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. रिपोर्ट्सनुसार ती या अॅपवरील प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी 3 कोटी रुपये घेते.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा पहिल्या 30 मध्ये स्थान मिळवणारा दुसरा भारतीय असून गेल्या वर्षी तो 23 व्या क्रमांकावर होता. यावेळी त्याने प्रियांका चोप्राला मागे टाकत 19 व्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे 125 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि प्रत्येक पोस्टवर 5 कोटी रुपये मिळतात. या यादीत शीर्षस्थानी फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोचे देखील नाव आहे. त्याचे 295 फॉलोअर्स आहेत आणि प्रत्येक पोस्टवर त्याची 11 कोटींची कमाई होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.