Chandrachur Singh Dainik Gomantak
मनोरंजन

Chandrachur Singh : अभिनेता होण्यासाठी यूपीएससी सोडली पण एका घटनेने सारं काही उद्ध्वस्त झालं

अभिनेता चंद्रचूड सिंहने अभिनेता होण्यासाठी युपीएससी सोडली होती.

Rahul sadolikar

अभिनेता चंद्रचूड सिंह आठवतोय? हा तोच जो जोश चित्रपटात ऐश्वर्या रॉयच्या मागे मेरे खयालो की मलीका गात हिंडत असतो. सुरूवातीला चंद्रचूडचं स्वप्न काहीतरी वेगळं होतं ;पण नंतर त्याला त्याचा मार्ग सापडला आणि तो यशस्वीही झाला.

कुणी काही म्हणेना त्या अभिनेत्यानं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्याला तू हिरो होशील असं कुणी म्हटलं असते तर ते खरं ठरलं नसतं. त्यावरुन जे कुणी हे बोललं त्याला वेड्यात काढले असते. मात्र चंद्रचूड सिंहन आपण वेगळेच असून आपल्याकडे काय क्षमता आहे हे दाखवून दिलं.

जोश आणि माचिसमधला चंद्रचूडचा अभिनय

ज्यांनी शाहरुख आणि चंद्रचूडचा जोश पाहिला असेल त्यांना तो कशा धाटणीचा अभिनेता आहे कळून जाईल. गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला माचिस चित्रपटही चंद्रचूडची वेगळी ओळख आहे. त्यानंतरही त्यानं बऱ्याच चित्रपटामध्ये कामं केली. वेबसीरिजमध्येही तो चमकला. एकुणच चंद्रचूडची बॉलीवूडमधील ओळख वेगळीच होती. त्यानं स्वताचे वेगळेपणही जपले ही जास्त महत्वाची बाब म्हणावी लागेल.

अभिनेता व्हायचं होतं म्हणून...

असं म्हटलं जातं की, चंद्रचूडनं युपीएससीची तयारी सुरु केली होती. त्याचा जोरदार अभ्यासही सुरु होता. पण मनातून त्याला अभिनेता होण्याची खूपच इच्छा होती. आपण चांगल्या अधिकाऱ्यापेक्षा चांगला अभिनेता नक्की होऊ असे त्याला वाटायचे. त्यात यशस्वीही झाला. वेगळ्या धाटणीचा अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले. वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्याला त्याच्या अभिनयासाठी गौरविण्यात आले आहे.

90 च्या दशकातला लोकप्रिय अभिनेता

90 च्या दशकांतील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये चंद्रचूडचे नाव घ्यावे लागेल. या अभिनेत्यानं त्यावेळच्या दिग्गज अभिनेत्यांना टक्कर देत स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. आता चंद्रचूड सिंह ला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी त्यानं त्याच्या मुलासोबत फोटोग्राफर्सला पोझ दिली. यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही मेसेजेसनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

चंद्रचूड सिंहचा अपघात झाला अन्

चंद्रचूडच्या वैयक्तिक आय़ुष्याविषयी सांगायचे झाल्यास त्यानं युपीएससीच्या परिक्षा सोडून दिल्या. त्याचे करिअर जेव्हा यशाच्या शिखरावर होते तेव्हा मात्र ती गोष्ट घडली आणि त्याला मोठा झटका बसला. गोव्यात वॉटर स्कीइंगच्या दरम्यान त्याला अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला. अजूनही त्याची फिजिओथेरपी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT