Rakhi Sawant  Dainik Gomantak
मनोरंजन

"तिची आई गेली तेव्हा ती बिर्याणी खात होती" पतीने केले 'राखी सावंत'वर आरोप

अभिनेत्री राखी सावंत चर्चेत राहणार नाही असे होऊच शकत नाही आता राखी एका आरोपामुळे चर्चेत आहे.

Rahul sadolikar

आदिल दुर्राणीने पत्नी राखी सावंतवर केलेल्या आरोपामुळे आता सोशल मिडीयावर यूजर्सचं मनोरंजन होत आहे.

या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आदिलने राखी सावंतवर अनेक आरोप केले आहेत. तसेच राखीने तिच्या आईशी केलेल्या वागणुकीबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

राखी सावंत आणि आदिल दुर्राणी

राखी सावंत आणि आदिल दुर्राणी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एकीकडे आदिल राखीची गुपिते उघड करत आहे तर दुसरीकडे राखी सावंत आदिलच्या आरोपांना उत्तर देत आहे. 

मात्र या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आदिलने राखी सावंतबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून सोशल मिडीयावर आश्चर्य व्यक्त होत आहे. राखीवर आरोप करताना आदिलने सांगितले की, आईच्या मृत्यूनंतर अनेक तास राखी तिथे गेली नाही आणि बसून बिर्याणी खात होती.

राखीने लोकांकडून पैसे घेतले

मीडियाशी बोलताना आदिल म्हणाला- 'मी राखीच्या आईचा आवडता व्यक्ती होतो. माझ्या आईला कॅन्सर आहे, असे सांगून राखी सावंतने अनेकांकडून पैसे घेतले.पण दिलेले पैसे राखी उडवायची . ती दर महिन्याला लोकांकडून 1 ते 2 लाख रुपये घेत असे.

आई गेली तेव्हा राखी तिथे नव्हती

यासोबतच आदिल दुर्रानी म्हणाले- 'राखी सावंतच्या आईचे 3 वाजता निधन झाले. साडेतीनच्या सुमारास मी तिथे पोहोचलो होतो.पण राखी आली नव्हती. त्यावेळी पठाणचा रिव्ह्यू सुरू होता आणि संपूर्ण मीडिया तिथे होता. मात्र सायंकाळी 7 वाजेपर्यंत राखी आईचा मृतदेह पाहण्यासाठी आली नाही.

राखी चिकन खात होती

'ज्या दिवशी राखीची आई वारली, त्या दिवशी मी तिची काळजी घेण्यासाठी रात्री तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. तिथं जे दिसलं ते पाहून मला आश्चर्य वाटलं. मध्यरात्री राखी चिली चिकन, मटण बिर्याणी आणि प्रॉन कबाब खात होती. 

आदिर दुर्राणीवर अनेक आरोप करत राखीने आदिलला तुरुंगात पाठवले होते . आदिल 6 महिन्यांनी परतला असून राखीची पोल उघडत आहे. त्याचवेळी राखी सोशल मीडियावर आदिलच्या आरोपांबाबत पोस्ट करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

SCROLL FOR NEXT