Abhishek Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

Abhishek Kumar: अभिषेक कुमारने नाकाराला खतरों के खिलाडी शो; 'हे' आहे कारण

Abhishek Kumar: याशिवाय एकता कपूरचा शो 'नागिन 7' आणि रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी सीझन 14' मध्ये तो दिसणार असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या.

दैनिक गोमन्तक

Abhishek Kumar: बिग बॉस या शो मध्ये सहभागी झालेले आणि आपली वेगळी ओळख निर्माण केलेले स्पर्धक चाहत्यांच्या कायम लक्षात राहतात. त्याबरोबरच, त्यांच्याबद्दल नेहमीच चर्चा रंगताना दिसते. आता बिग बॉसच्या १७ व्या सीझन मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिषेक कुमार हा सध्या चर्चांचा भाग बनला आहे.

नुकताच त्याचा मन्नारा चोप्रासोबतचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला. याशिवाय एकता कपूरचा शो 'नागिन 7' आणि रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी सीझन 14' मध्ये तो दिसणार असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. मात्र, तो टीव्ही सीरियल करणार की नाही हे अजूनपर्यंत समजलेले नाही. पण त्याने स्वतःला रिॲलिटी शोपासून दूर केले आहे.

असे म्हटले जात आहे की, ही ऑफर नाकारण्यामागचे कारण बोलायचे झाले तर ती त्याची 'भीती' आहे. कारण तो जर या शोचा भाग बनला तर त्याची भीतीमुळे तो या रिॲलिटी शोमध्ये फार काळ टिकू शकणार नाही.

सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस'मध्ये त्याने अनेकवेळा आपण क्लॉस्ट्रोफोबिक असल्याचा उल्लेख केला आहे. तो लिफ्टही वापरत नाही. ते पायऱ्या चढून ८व्या-९व्या मजल्यावर जातात. अशा परिस्थितीत रोहित शेट्टीच्या शोमध्ये अनेक स्टंट्स असतील, जे पाण्याखाली किंवा बॉक्सच्या आत करावे लागतील. जे करण्यात त्यांना साहजिकच अडचण येणार आहे.

आता अभिषेक शिवाय या शोची ऑफर कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आत्तापर्यंत कोण या शोचा भाग असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT