20 Years Of Devdas | aishwarya rai  Dainik Gomantak
मनोरंजन

20 Years Of Devdas: 'पारो' ने चाहत्यांसाठी शेअर केला खास फोटो

दैनिक गोमन्तक

संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहे. पारोची भुमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. ऐश्वर्याने सोशल मिडीयावर तिची एक झलक शेअर करत चाहत्यांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. (20 Years Of Devdas News)

'देवदास' च्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऐश्वर्याने 'पारो'चा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पारंपारिक पोशाख आणि दागिन्यांमध्ये मोठ्या बिंदीसह पारोच्या भूमिकेत ऐश्वर्याला पाहून तुम्ही पुन्हा एकदा तिच्या सौंदऱ्याच्या प्रेमात पडाल.

ऐश्वर्याने पारोचा फोटो पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव सुरू केला आहे. अभिषेक बच्चननेही हार्ट इमोजीसह कमेंट केली. एका चाहत्याने पोस्टवर लिहिले, "तुम्ही विश्वासाच्या पलीकडे होता." तर दुसऱ्याने लिहिले, "20 वर्षे अद्भुत! ते नुकतेच रिलीज झाले आहे असे दिसते. या क्लासिक चित्रपटात (Movie) शाहरुख खानने देवदासची भूमिका साकारली होती. तर ऐश्वर्या पारो या त्याच्या बालपणीच्या प्रेमाच्या भूमिकेत दिसली होती. चंद्रमुखीच्या महत्त्वाच्या भूमिकेत माधुरी दीक्षितही होती. चुन्नी बाबूची भूमिका जॅकी श्रॉफने साकारली होती. तर पारोच्या आईच्या भूमिकेत किरण खेरनेही मने जिंकली.

राणी नंदिनीच्या भूमिकेत पुन्हा पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज

ऐश्वर्या पुन्हा एकदा चित्रपटाच्या पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली आहे. मणिरत्नम यांनी प्रोड्यूस केलेला 'पोनियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा तिचा चित्रपट चर्चेत आहे. ऐश्वर्याच्या लूकचे सगळेच कौतुक करत आहेत. यामध्ये ती राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. कारागिरांना हा लूक देण्यासाठी सहा महिने मेहनत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून तो खूप पसंत केला जात आहे. ऐश्वर्याचे चाहते या चित्रपटाची नक्कीच आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलगु आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT