Amboli  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Amboli : आर्थिक वादातून अपहरण, मारहाण आणि दोघांचा मृत्यू; घाटात रात्रीच्या अंधारात रंगले थरार नाट्य

गोमन्तक डिजिटल टीम

Amboli : आर्थिक देवघेवीच्या वादानंतर पंढरपूर येथील मुकादम सुशांत खिल्लारे याचे अपहरण करून कराड येथे घातपात करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी आंबोली घाटातील दरीत टाकण्याचा प्लान रचण्यात आला.

परंतू प्लास्टिक पिशवीत असलेला मृतदेह खाली टाकताना तोल जावून भाऊसो माने हा घाटात कोसळला, अशी कबुली या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित तुषार पवार यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली आहे. तसेच या प्रकाराने आंबोलीचा गुन्हे लपवण्यासाठी होणारा वापर पुन्हा एकदा उघड झाला आहे.

याबाबत सावंतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तुषार पवार व माने मित्र आहेत. कऱ्हाड येथे शेतीशी संबंधित व्यवसाय आहे. त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला आहे.

त्या ठिकाणी कामगार हवे असल्यामुळे पंढरपूर येथे मुकादम खिल्लारे यांच्याकडून माने याने कामगार मागिवले होते. त्यासाठी त्याला तीन लाख रुपये दिले होते. परंतु पैसे घेतल्यानंतर खिल्लारे याने कामगार दिले नाहीत.

पैसे परत करण्यास नकार दिला. पैसे वसुलीसाठी तुषार पवार व माने यांनी कट रचला. त्यांनी 19 जानेवारीला खिल्लारे यांचे पंढरपूर येथून अपहरण केले. त्याला गोड बोलून निर्जनस्थळी बोलवत अपहरण करून कऱ्हाडला आणले.

त्याला माने याने कऱ्हाड येथे आपल्याच घरात दहा दिवस नजर कैदेत ठेवले. त्यांनी रविवारी (ता. 29) खिल्लारेला दारू पिण्यास घरासमोर असलेल्या शेतात नेले. यावेळी तिघांत वाद झाले.

दोघांनीही त्याला जोरदार मारहाण केली. मारहाणीत खिल्लारे याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. यामुळे पुरावा नष्ट करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.

दरम्यान अचानक तो मृत्युमुखी पडल्याने दोघेजण घाबरले. यावेळी मृतदेहाचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. यावेळी पवार यांनी आपण माझ्या कारमधून मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकू, असे सांगितले.

त्यानुसार त्यांनी कट रचला. ते सोमवारी (ता. 30) दोघे आंबोलीच्या दिशेने आले. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास प्लास्टिक पिशवीत असलेला मृतदेह दरीत टाकत असताना मानेचा पाय निसटला व तो मृतदेहासह खोल दरीत कोसळला.

अचानक हा प्रकार झाल्यानंतर पवार घाबरला. मात्र, काय करावे हा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला. रात्र असताना सुद्धा त्याने त्याच ठिकाणी घाटात राहणे पसंत केले. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास

त्याने कन्हाड येथील आपल्या मित्राला फोन करुन घटना सांगत तुम्ही या असे सांगितले. मित्राने हा प्रकार गंभीर असल्याने खिल्लारे व माने यांच्या घरातील लोकांना कल्पना दिली. त्यानंतर माने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला.

कऱ्हाड पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली. शोधाशोध सुरू झाली. मुख्य धबधब्याजवळील स्टॉलवर पवार बसलेला होता. त्याच्याकडे विचारणा केली असता हा प्रकार रात्री घडला आहे.

त्यानंतर आपण येथे बसून घेतले. होतो. रात्री याच ठिकाणी झोपलो, असे त्याने सांगितले. त्यानुसार त्याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आंबोली येथील युवकांच्या मदतीने खोलदरीत उतरून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते उत्तरीय तपासणीसाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. पोलिस पवारची कसून चौकशी करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT