ट्विट करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न Dainik Gomantak
महाराष्ट्र

ट्विट करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस पोहचताच...

सायबर पोलीस स्टेशनला एक तात्पुरती सूचना मिळाली होती की, मानसिक ताणतणावाच्या कारणामुळे हा तरुण आत्महत्या करण्याबद्दल बोलत होता.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मायानगरी मुंबई (Mumbai). याच मुंबईत एका व्यक्तीने आत्महत्या करत असल्याची माहिती ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून दिली. मात्र त्याने हे पाऊल उचलण्यापूर्वीच पोलिसांच्या सायबर सेलने सोशल मीडियाच्या मदतीने त्या व्यक्तीला वाचवले. (Young man attempts suicide by tweeting)

सायबर पोलीस स्टेशनला एक तात्पुरती सूचना मिळाली होती की, मानसिक ताणतणावाच्या कारणामुळे हा तरुण आत्महत्या करण्याबद्दल बोलत होता. शनिवारी सकाळी एका पत्रकाराने ही माहिती सायबर पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर दिली होती. यानंतर पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला.

खरं तर, पोलिसांना अशी माहिती मिळाली की 30 वर्षीय तरुणाने ट्विटरवर सांगितले की त्याला आपले जीवन संपवायचे आहे. परंतु या तरुणाने कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वीच पोलिसांनी मुंबईच्या दादर येथील हॉटेलमधून त्याची सुटका केली. संजय गोविलकर या पोलीस पथकाचे नेतृत्व करत होते. घटनास्थळी पोहोचल्यावर निरीक्षक आणि हॉटेल मॅनेजरने हॉटेलची खोली उघडली तेव्हा हा तरुण चाकू घेऊन खोलीच्या आत आत्मह्त्या करण्याचा प्रयत्न करत होता. दुसरीकडे, हॉटेल मॅनेजरने त्या तरुणाची खोली डुप्लीकेट चावीने उघडली होती. त्वरित कारवाई करत पोलिसांनी त्या तरुणाला पकडले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.

मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याने युवक नैराश्यात होता

पोलिसांनी केलेल्या चौकशीत युवकाने सांगितले की तो केरळचा रहिवासी आहे आणि डिप्लोमाचा विद्यार्थी आहे. तरुणाने सांगितले की त्याच्या मैत्रिणीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. म्हणून तो डिप्रेशनमध्ये गेला. पोलिसांनी सांगितले की, हा तरुण शुक्रवारी हॉटेलमध्ये आला होता. दरम्यान या तरुणाला तातडीने मानसिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले जेथे त्याचे वैद्यकीय समुपदेशन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT