महाराष्ट्रात कोरोना संसर्ग (Covid 19) कमी होण्याचं नाव घेत नसतानाच आता केरळनंतर (Kerala) महाराष्ट्रात (Maharashtra) झिका व्हायरसनं (Zika Virus) शिरकाव केला आहे. झिकाचा व्हायरसचा पहिलाच रुग्ण पुण्यात (Pune) आढळून आला आहे. पुण्यातील महिलेला झिकाची लागण झाली आहे. सध्या या व्हायरसग्रस्त महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती राज्यातील आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. दुसरीकडे केरळात झिका व्हायरसने हाहाकार माजवला आहे. राज्यात आणखी दोन झिका व्हायरसग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे झिकाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 63 झाली आहे. सध्या राज्यात 3 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती केरळ राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली आहे.
झिकाची लागण नेमकी कशी होते?
एडिस जातीचा डास चावल्यानंतर झिकाची लागण होते. एडिस जातीच्या डासाची वाढ चांगल्या पाण्यामध्ये होते. या डासामुळे चिकनगुनिया, पिवळा ताप, डेंग्यू होण्याची दाट शक्यता असते. गर्भवती महिलांना झिकाचा सगळ्यात मोठा धोका आहे. विशेषत: झिकाची लागण गर्भातील बाळाला होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर बाळाला विविध आजार देखील होऊ शकतो.
झिकाची लक्षणं
अंग दुखणे, पिवळा ताप तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे ही मुख्यत:हा झिका व्हायरसची लागण होण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखीचा त्रास होतो, अशक्तपणा आणि त्याबरोबर थकवा देखील जाणवतो. ही लक्षणे साधारणत:हा दोन ते तीन दिवस कायम राहतात. असं असलं तरी सुरुवातीला आलेल्या तापावरुन झिकाची लागण झाली असल्याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच चाचणी करुन त्याचे निदान करणं आवश्यक आहे.
उपाय
एडिस जातीचा डासापासून स्वता:चं संरक्षण करणे हाच सर्वात मोठा एकमेव उपाय आहे. संशयित रुग्णांची वेळेवर चाचणी करणे अत्यावश्यक आहे. हा झिका व्हायरस डासामुळे पसरत असल्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर डबकी किंवा घरामध्ये फा दिवस पाणी भरुन ठेवू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.