Rajesh Tope Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोरोनाची चौथी लाट येईल का ? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

''कोरोनाची चौथी लाट येईल अशी कुठलीही स्थिती नाही''

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. मुंबईत गेल्या दहा दिवसांत तब्बल 35 टक्क्यांनी रुग्ण वाढले आहेत. त्यामुळं कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

ते पत्रकारांशी बोलत होते. 'राज्यात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीचा वेग अतिशय कमी आहे. दिवसाला साधारण सव्वाशे ते दीडशे रुग्णांची नोंद होत आहे. अर्थात, ही रुग्णवाढ ठराविक पॉकेटमध्ये आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांमध्येच हे रुग्ण दिसत आहेत. मात्र, त्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाची चौथी लाट वगैरे येईल अशी कुठलीही परिस्थिती नाही, असं टोपे म्हणाले.

कोरोनाच्या रुग्णवाढीमुळं घाबरून जाण्याची गरज नाही हे सांगताना राजेश टोपे यांनी उत्तर भारतातील परिस्थितीचा दाखला दिला. ‘गुजरातमध्ये अलीकडंच देशातील सर्व आरोग्यमंत्र्यांची एक बैठक झाली. आयसीएमआर व नीती आयोगाचे लोकही या बैठकीत सहभागी झाले होते. कोरोनाच्या अनुषंगानं या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण वाढतायत. त्याबाबत मी तेथील आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्ण वाढत असले तरी लक्षणं सौम्य आहेत. उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची गरज लागत नाही. घरीच उपचार घेऊन लोक बरे होतायत,' असं टोपे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT