Water Cut in Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईतील 'या' भागात सोमवार-मंगळवार पाणी येणार नाही

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई आणि मुंबई महानगरपालिका ( BMC ) परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे . सोमवार आणि मंगळवारी मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे . म्हणजेच 14 आणि 15 मार्च रोजी मुंबईतील अनेक भागात पाणी येणार नाही. त्यामुळेच मुंबईकरांना हे दोन दिवस पाणी साठवण्याचा आणि कमी खर्च करण्याचा सल्ला दिला जात आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत (Mumbai) ठिकठिकाणी पाणीकपात होत आहे. महापालिकेच्या वतीने लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकाजवळील 1450 मिमी व्यासाचा तानसा पूर्व आणि पश्चिमेकडील मुख्य तलावातून येणाऱ्या पाण्याच्या गळतीची तक्रार दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच मुंबईकरांना पाणीकपातीची (Water Cut in Mumbai) माहिती देण्यात आली आहे.

हे काम सोमवारी सुरू होऊन मंगळवारी दुपारपर्यंत चालणार आहे. दरम्यान, पालिकेच्या G/दक्षिण आणि G/उत्तर विभागातील अनेक भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या भागातील घरांमध्ये पाणी येणार नाही तर G/दक्षिण विभागाच्या काही भागात पाणी कमी फोर्सने येणार.

नळांमध्ये पाणी येणार नाही

जी/दक्षिण विभागाचा दिलाई रोड बीडीडी, पुर्ण प्रभादेवीचा परिसर, जनता रेसिडेन्सी, पुरा लोअर परळ, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, एन.एम.जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एसओएस अमृतवार मार्ग असेल. पाणीकपातीचा फटका सोमवारी दुपारी अडीच ते साडेतीन दरम्यान बसणार आहे. दुसरीकडे जी/उत्तर विभागातील संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एलजे मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेना भवन परिसर, मोरी मार्ग, टीएच कटारिया मार्ग, कापड बाजार संपूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभागालाही पाणी मिळणार नाही.

पाणी वाचवून खर्च करा बीएमसीचे आवाहन

जी/दक्षिण विभागाच्या नाम जोशी मार्ग, देलाई रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार पामर्ग, महादेव पालव मार्ग येथे मंगळवारी पाणी नसेल. तसेच जी/दक्षिण भागातील धोबीघाट, सात रस्ता परिसरात पुर्ण फोर्सने पाणी येणार नाही. अशा स्थितीत मुंबई महापालिकेने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत पाणी वाचवून खर्च करण्याचेा सल्लाही दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT