Valpoi Government Hospital: रुग्णांची चिंता मिटली! गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात 'ACGL' चा मोठा धमाका! वाळपई Goa Development Newsइस्पितळाला मिळालं नवजीवन

ACGL CSR Valpoi Hospital: माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी ही कंपनी उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती
ACGL healthcare initiative Goa
ACGL healthcare initiative GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: ‘एसीजीएल’ कंपनीने ‘सीएसआर’ निधीतून वाळपई सरकारी इस्पितळाला वैद्यकीय उपकरणे प्रदान केली. ‘एसीजीएल’ ही गोव्यातील आघाडीची कंपनी असून तिने हजारो लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिल्यो आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी ही कंपनी उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीएसआरच्या माध्यमातून कंपनीने समाजाभिमुख अनेक उपक्रम राबवले असून गोव्याच्या उद्योगविश्वात या ऑटोमोबाईल कंपनीचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

ACGL healthcare initiative Goa
V.D. Satheesan New CM: काँग्रेसचे व्ही. डी. सतीशन बनले केरलमचे नवे मुख्यमंत्री, 60 वर्षांनंतर रचला नवा इतिहास; संपूर्ण कॅबिनेटने घेतली एकत्र शपथ VIDEO

वाळपई सार्वजनिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमात ‘ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड’तर्फे सीएसआर निधीतून विविध वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली. त्यावेळी राणे बोलत होते.या कार्यक्रमास ‘एसीजीएल’चे मुख्य अधिकारी प्रणब घोष, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद देसाई, वाळपईचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास नाईक, सीएमओ संदेश मडकईकर, प्रसन्ना गावस, सय्यद सरफराज, विनोद हळदणकर, वसिउद्दीन सय्यद, शेहझीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रणव घोष म्हणाले की, ‘एसीजीएल’ कंपनीने समाजाभिमुख कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. सत्तरीत कार्यरत असलेल्या या जुन्या कंपनीच्या उभारणीत माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे मोठे योगदान आहे. कार्यक्रमात संदेश मडकईकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या इस्पितळाला नवीन सोनोग्राफी आणि अल्ट्रासाऊंड यंत्रांसह अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली. डॉ. विकास नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले

ACGL healthcare initiative Goa
धर्म अन् अंतर्गत वादांमुळे प्रादेशिक पक्ष संपणे घातक! आरजीतील घडामोडींवर CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया

दरम्यान, या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन, विविध रक्त तपासण्यांसाठी पूर्णतः स्वयंचलित ऑटो अॅनालायझर, प्रगत फिजिओथेरपी उपकरणे तसेच कार्डिअॅक मार्कर तपासणी सुविधेसह आय-क्रोमा मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गावागावांत आपत्कालीन सेवा केंद्राचा मानस

राणे म्हणाले की, वाळपई इस्पितळात लोकांच्या सेवेसाठी विविध नवीन आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या इस्पितळातील देखभाल आणि दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. जी-सुडा माध्यमातून ही कामे केली जाणार असून ग्रामीण भागात लहान पण सक्षम आपत्कालीन सेवा केंद्रे उभारण्याचा सरकारचा मानस आहे.

गुळेली येथे पुढील ३० दिवसांत आपत्कालीन सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असून महिलांसाठी अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकांना मोफत उपचार मिळत असून या सुविधांचा अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com