Maharashtra Monsoon Session Video Dainik Gomantak
महाराष्ट्र

Video: 50 खोके एकदम OK वरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक अन् सत्ताधाऱ्यांमध्ये राडा

Maharashtra Monsoon Session: आज पाचव्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर वेगळाच गोंधळ बघायला मिळाला.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Monsoon Session: महाराष्ट्र राज्याचे पावसाळी गेल्या चार दिवसांपासून सुरू असून आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसात हे अधिवेशन चांगलच गाजलं. चौथ्या दिवशी मुंबईतील खड्डे आणि ट्राफिकचा प्रश्न चांगलाच गाजला. मात्र आज पाचव्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर वेगळाच गोंधळ बघायला मिळाला.

गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी होत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न देखील चांगलाच कडकडला आहे. या सर्व पार्श्वभूमीर आजचा पाचवा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता होती. मात्र हा दिवस अशा पद्धतीने वादळी ठरेल असा विचार राज्यातील जनतेने केला नसावा.

आई-बहिणीवरुन शिवीगाळ

सत्ताधारीही विधानभवनाच्या पाऱ्यांवर घोषणा देत होते. काल मविआच्या बैठकीत शेतकऱ्यांचे मुद्दे मांडण्यात आले. ओला दुष्काळाची मागणी करण्यात आली. यादरम्यान आज विधानभवनाबाहेर सत्ताधारी आणइ विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की केली, आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली.

'आम्ही संस्कृती जपणारी माणसं, पवारांचे विचारांवर चालणारी, मी या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला शिवीगाळ करणाऱ्यांना समज द्या. आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारणारच. 50 खोके एकदम ओक्के त्यांच्या जिव्हारी लागलं. शांततेत आंदोलन सुरू होतं. मात्र या वागणूकीमुळे राज्यात अशोभनीय कृत्य घडले आहे. शिंदे नावाच्या आमदारांनी पत्रकारांनाही धक्काबुक्की केली. गैरवर्तन करण्याची सुरवात सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.

दरम्यान, आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करत होते. दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT