भारतीय जनता पक्ष (BJP) लोकसभा 2024 निवडणूकीच्या (Loksabha 2024 Election) तयारीला लागला आहे. भाजपचे अनेक जेष्ठ नेते आणि विविध केंद्रीय मंत्री विविध लोकसभा मतदारसंघात जाऊन तेथील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच, नागरिकांशी संवाद साधून पक्ष संगठण मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman), शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Nationalist Congress Party) (NCP) वर्चेस्व असलेल्या बारमतीत (Baramati) तीन दिवसीय दौऱ्यासाठी गुरूवारी दाखल झाल्या आहेत.
बारामती मतदारसंघावर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चेस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. भाजपने या मतदारसंघात आपले स्थान निर्माण करण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे. 2019 च्या निवडणूकीत राहूल गांधी (Rahul Gandhi) लढवत असलेल्या अमेठी (Amethi) मतदारसंघात देखील या पद्धतीचा वापर करून, राहूल गांधी यांचा पराभव करण्यात भाजपला यश आले होते. सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती ईराणी (Smriti Irani) या अमेठीतून विजयी झाल्या.
काय आहे व्हायरल व्हिडिओ?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुरूवारी पुण्यात (Union Finance Minister Nirmala Sitharaman on Pune visit) दाखल झाल्या. पुण्यात विविध पदाधिकाऱ्यांची सीतारामन यांनी भेट घेतली. त्यानंतर सीतारमन यांनी सासवडमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या घरी बूथ अध्यक्षांची बैठक घेतली. बैठक संपवून त्या बाहेर आल्या. पण, ज्या भाजपा कार्यकर्त्याच्या घरी ही बैठक झाली, त्यांच्या कुटुंबाला अर्थमंत्र्यांबरोबर एक फोटो काढायचा होता. कार्यकर्त्यांनी त्याबद्दल आग्रह करताच निर्मला सीतारामन त्याच्यावर संतापल्या आणि खडे बोल सुनावले. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला, भोर, पुरंदर, दौड, इंदापूर आणि बारामती या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. तसेच, पुण्यातील इतर भागाचा देखील यात समावेश होतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सर्व भागात बैठका घेऊन चर्चा करतील, तीन दिवसांच्या दौऱ्यात त्या जवळपास 21 विविध बैठका घेतील अशी माहिती समोर आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.