Russia Ukraine War Dainik Gomantak
महाराष्ट्र

युक्रेनमध्ये अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी; हेल्पलाइनवरून साधतायत पालकांशी संपर्क

युक्रेनमध्ये अडकलेल्या अशा भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia-Ukraine Crisis) ज्याप्रमाणे संपूर्ण जग चिंतेत आहे, त्याचप्रमाणे भारताच्याही चिंतेते भर पडत आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील कीव्ह, खार्किव या प्रमुख शहरांमध्ये विध्वंसाचे वातावरण आहे. या वातावरणात अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या अशा भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या अनेक नागरिकांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील कल्याण-डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. (7 students from Kalyan Dombivali Thane stranded in Ukraine)

युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या पालकांशी बोलू शकतात. ठाणे जिल्ह्य़ातील जनतेने युक्रेनमध्ये कोणत्याही ओळखीची व्यक्ती अडकल्यास जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

युक्रेनमध्ये अडकले ठाणे, कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील 7 विद्यार्थी आहेत त्यांची नावे याप्रमाणे; शुभम म्हाडसे (मुरबाड), संतोष चव्हाण (भिवंडी), प्रथमा सावंत (नवी मुंबई), चैताली संझगिरी (ठाणे), लक्ष संझगिरी (ठाणे), हेमंत नेहरे (कल्याण), संकेत पाटील (डोंबिवली)

ठाणे जिल्ह्यासाठी हा हेल्पलाइन क्रमांक आहे

ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय ठाणे यांचा दूरध्वनी क्रमांक- 022-25301740 / 25381886. ई-मेल आयडी- thaneddmo@gmail.com.

नवी दिल्ली सपोर्ट रूमशी संपर्क कसा साधावा

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री कार्यालय, नवी दिल्ली,

टोल फ्री क्रमांक - 1800118797

फोन क्रमांक - 011-23012113 / 23014105/23017905

फॅक्स क्रमांक - 011-23088 124

ई-मेल आयडी - situationroom@mea.gov.in

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT