इंजिनियरची बायको पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रेमात सैराट...

साहेब... 'पोलिस कर्मचाऱ्याने माझ्या पत्नीला पळवले'
Engineers wife in love with police officer sp give order an inquiry
Engineers wife in love with police officer sp give order an inquiryDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील अमरावती (Amravati) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे इन्स्पेक्टरवर पत्नीला पळवून नेल्याचा गंभीर आरोप केला आहे. तक्रारीनंतर पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पीडित तरुणाने तक्रारीत म्हटले आहे की, तो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कामाला होता. त्यावेळी त्यांची पत्नी एमपीएससीचे शिक्षण घेत होती. त्यानंतर इन्स्पेक्टर आणि माझी पत्नी या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले आणि हे प्रकरण शारीरिक संबंधापर्यंत पोहोचले. इन्स्पेक्टरच्या भीतीमुळे तो कधीच मोकळेपणाने बोलू शकला नाही पण त्याने पत्नीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मानली नाही.

Engineers wife in love with police officer sp give order an inquiry
शिपाई, हवालदार होणार सहायक पोलिस उपनिरीक्षक

मुलांसाठी राहिला गप्प

यादरम्यान त्याला इन्स्पेक्टरकडून धमक्या येऊ लागल्या आहेत. त्याच्या लहान मुलांच्या जिवाला धोका असल्याचे तो सांगत होता.म्हणून आपल्या मुलामुळे तो खूप घाबरला होता. त्यानंतर त्याने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र काही दिवसानंतर इन्स्पेक्टरच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी इंजिनियरच्या पत्नीला समजावून सांगून पुन्हा कुटुंबात परत जाण्याचा सल्ला दिला. मात्र पतीने तिला माफ केले तर ती पुन्हा त्याच्या सोबत रहायला तयार होईल, असे उत्तर प्रतिउत्तर पत्निकडून मिळाले.

Engineers wife in love with police officer sp give order an inquiry
उद्या एमपीएससीची पूर्व परीक्षा; आयोगाने केल्या 'या' सूचना प्रसिद्ध

इन्स्पेक्टरवर पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप

लहान मुलाच्या फायद्यासाठी, इंजिनियर पतीदेखील पत्नीला माफ करण्याचा आणि नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटानंतर त्याने पत्नीशी दुसरे लग्न केले. मात्र दुसऱ्या लग्नानंतर इन्स्पेक्टर अमूल बच्छाव याने पत्नीचे अपहरण करून तिला कुठेतरी पळून नेले. तक्रारीनंतर अमरावती पोलीस नियंत्रण कक्ष बच्छाव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने दर्यापूरच्या एसडीपीओ यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com