रशियन सैन्याने युक्रेनच्या राजधानी प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांना कीवमधून सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतु, त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टच्या हवाल्याने ही माहीती सांगण्यात आली आहे. अहवालात एका वरिष्ठ यूएस गुप्तचर अधिकार्याचा हवाला देत त्यात म्हटले की, झेलेन्स्कीने कीवमधून बाहेर पडण्याची ऑफर नाकारली आहे."लढा आम्ही देत राहू. मला दारुगोळा हवा आहे, पळून जाण्यासाठी सल्ला नको, अशा कठोर शब्दात झेलेन्स्की यांनी अमेरिकेने (America) दिलेल्या प्रस्तावाचा समाचार घेतला. (Ukraine president Volodymyr Zelenskyy rejected America offer to free kyiv)
दरम्यान, रशिया-युक्रेनमधील (Ukraine) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधात ठराव मांडण्यात आला. यावर सर्व देशांना मतदान करावे लागले. मात्र, भारताने या मतदानातून माघार घेतली. सर्व सदस्य देशांनी मतभेद आणि वाद मिटवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करावेत, असे भारताने म्हटले आहे.
तसेच, शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या ठरावाच्या बाजूने 11 मते पडली. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने मतदानापासून दूर राहिले. मात्र हा ठराव सुरक्षा परिषदेत संमत होऊ शकला नाही, कारण परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या रशियाने त्यावर व्हेटो केला होता. मतदानानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट केले की, जग आमच्यासोबत आहे, सत्य आमच्यासोबत आहे, विजय आमचाच होणार.
तत्पूर्वी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा खरपूस समाचार घेत म्हटले की, "आम्ही एकटेच आमच्या देशाचे रक्षण करत आहोत. युक्रेनची राजधानी कीववर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर लोक देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत." राजधानी कीववर क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान शुक्रवारी युक्रेनियन नागरिकांनी पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाकियामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सीमेवर तासनतास वाट पाहत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.