Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

''बाळासाहेब भोळे होते; मी मात्र भोळा नाही धूर्त आहे''

भाजपाने शिवसेनेला फसवल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल

दैनिक गोमन्तक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपच्या टीकेला थेट प्रत्युत्तर देत भाजपाला फटकारले आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यावेळी भाजपाने बाळासाहेबांना वेळोवेळी कसे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे,”. तसेच मी भाजपासोबत धुर्तपणे वागत असल्याचं त्यांनी नमूद केलं. एका प्रसारमाध्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यापूढे बोलताना ठाकरे म्हणाले “माझ्यावर आरोप होतो की, ही शिवसेना बाळासाहेबांची नाही, मी म्हटलं हो बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यावेळी कसे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे मी नाही म्हटलं तरी थोडासा धुर्तपणे भाजपासोबत वागतो आहे. तसेच आम्ही वाईट कारभार करत असू तर जरूर आम्हाला जनतेसमोर उघडं पाडा. मात्र, भाजपाने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्न विचारला होता.

आता त्यांना विचारण्याची गरज आहे की, महाराष्ट्राची संस्कृती पाहता भाजपाने महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय ? ही सुडबुद्ध तुमच्यात कोठून आली, ही कोणती संस्कृती आहे, तुमच्या रक्तात सुडबुद्धी कशी आली, हा विकृतपणा तुमच्याकडे कसा आला ?” अशा प्रकारे त्यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरले आहे. यावरुन महाराष्ट्र भाजप प्रतिउत्तर तर देणारच यामूळे भाजप शिवसेनेला नेमकी काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naibag Firing: 3 वर्षांपूर्वीची गोव्यातील चतुर्थी, वाळूमाफियांचा कुडचडेत गोळीबार; कामगाराने गमावला होता प्राण

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपसा रोखण्‍यासाठी गोव्यात दिशानिर्देशांचे पालन होतेय का?

Gold Silver Rate Today: सोनं, चांदी झालं महाग! काय आहेत मुंबई, गोवा, पुणे आणि नागपुरात ताजे भाव? वाचा

'त्यांचे वय झाल्याने त्यांना आदल्या दिवशी काय बोललो, याची आठवण नसावी', वीजदरवाढीच्या गोंधळावरून आपची ढवळीकरांवर टीका

Goa Village Survey: 'मच्छीमार' गावांचे सीमांकन वादग्रस्त! तज्ज्ञांकडून तपासाची मागणी; नकाशांचा शहानिशा अनिवार्य

SCROLL FOR NEXT