दिवसभर नमाज आणि हनुमान चालिसा म्हणायला तयार मात्र... राजू शेट्टी

शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यकर्त्यांना दुय्यम वाटत असल्याचं केलं भाष्य
Raju shetti
Raju shettiDainik Gomantk
Published on
Updated on

मुंबई : पांढऱ्या दुधातील काळे बोके या मुद्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण हालवून सोडलेले तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सातत्याने राज्य शासनाला धारेवर धरणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी लाउडस्पीकर, हनुमान चालिसा आणि अजानच्या मुद्यावरून भाष्य केलं असुन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ही लक्ष राज्यकर्त्यांनी द्यावे अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केलं आहे. (Raju Shetty criticizes the state government)

Raju shetti
Mumbai Local Train: चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, 'फर्स्ट क्लास' चा प्रवास झाला स्वस्त

राजू शेट्टी याबाबत म्हणाले कि, दिवसभर नमाज आणि हनुमान चालिसा म्हणण्याची तयारी आहे. याबदल्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होणार असतील, शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळत असेल आणि शेतकऱ्यांच्या मुलांना पाहिजे तसं शिक्षण मिळत असेल तर मी दिवसभर नमाज पडायला, हनुमान चालिसा म्हणायला तयार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले.

Raju shetti
उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

तसेच राज्यामध्ये उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू आहे. विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून त्यांना शाळेतून बाहेर काढण्यात येते. रोजगार हिरावला जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत गॅसचे भाव वाढले आहेत. हे प्रश्न महत्त्वाचे असताना या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नसल्याचे शेट्टी यांनी म्हटले. अनावश्यक गोष्टीवर वाद करून धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केले जात आहे. आणि त्यावर राजकीय पोळी भाजली जात असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले.

उसाच्या पिकाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याचाही राजू शेट्टी यांनी समाचार घेतला. एका बाजूला उसामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे असं सांगत करायचे आणि दुसरीकडे नवीन कारखाने विकत घ्यायाचे याला दुटप्पी भूमिका म्हणत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले. गडकरींचे चाललंय तेच पवारांचा चालले पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणतात आणि गडकरी आत्महत्या करावी लागेल असे म्हणतात दोघेही देशातील जबाबदार नेते आहेत.

उसाकडेच शेतकऱ्याचा ओढा का या प्रश्नाच्या मुळाकडे हे दोघे जात नाहीत. त्यांना माहीत असली तरी प्रश्नाच्या मुळाकडे जाणार नसल्याचे ही शेट्टी यांनी म्हटले. ऊस हे एकमेव पिक आहे, ज्याला केंद्र सरकार हमीभाव जाहीर करते आणि हा हमीभाव देणे कारखान्यांना बंधनकारक असतं. त्यामुळे उसाचे उत्पादन वाढले आहे. याच पद्धतीने सर्व पिकांचं हमीभाव केंद्र सरकारने दिला तर उसाचे उत्पादन वाढणार नाही असेही राजू शेट्टींनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com